ABP Cvoter Survey for UP Election 2022: उत्तर प्रदेशात पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हे पाहता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. सत्ताधारी भाजप, मुख्य विरोधी पक्ष समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेस व्यतिरिक्त छोट्या पक्षांनीही रॅली आणि कॉन्फरन्सद्वारे जनतेला आकर्षित करणे सुरू केले आहे. दरम्यान, एबीपी न्यूजसाठी सी व्होटर या सर्वेक्षण एजन्सीने यूपीच्या लोकांच्या मनाचा कल जाणून घेतला आहे.


उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर येऊ शकते असं या सर्वेक्षणात स्पष्ट दिसत आहे. मात्र, 2017 च्या तुलनेत जागा कमी होताना दिसत आहेत. पण सर्वेच्या आकडेवारीनुसार, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह सत्तेत परतू शकतो.


एबीपी न्यूज-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, जर आता विधानसभा निवडणुका झाल्या तर भाजपला 41 टक्के, सपाला 32 टक्के आणि बसपाला 15 टक्के मते मिळू शकतात. प्रियांका गांधी यांच्या प्रयत्नांना न जुमानता, काँग्रेस फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाही आणि पक्षाच्या खात्यात फक्त 6 टक्के मतांचा वाटा जात असल्याचे दिसते. त्याचबरोबर इतरांनाही 6 टक्के मते मिळू शकतात.


यूपीमध्ये कोणाला किती मतं?


एकूण सीट- 403



BJP+ 41%
SP+  32%
BSP-  15%
कांग्रेस- 6%
अन्य- 6%


उत्तर प्रदेशच्या सर्वेक्षणानुसार, जर मतांची टक्केवारी जागांमध्ये बदलली तर भाजपला 241-249 जागा, सपा 130-138, बसपाला 15-19 जागा मिळतील असे वाटते. तीन ते सात जागा काँग्रेसच्या खात्यात येऊ शकतात. तर इतरांना 0-4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.


यूपीमध्ये कोणाकडे किती जागा आहेत?
एकूण सीट- 403


BJP+ 241-249
SP+ 130-138
BSP- 15-19
कांग्रेस- 3-7
अन्य- 0-4


टीप : पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाबसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक राज्यांमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. अशा वातावरणात, C VOTER ने abp न्यूजसाठी पाच निवडणूक राज्यांचा मूड जाणून घेतला आहे. या सर्वेक्षणात 98 हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आहे. हे सर्वेक्षण 4 सप्टेंबर 2021 ते 4 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये त्रुटीचे मार्जिन प्लस मायनस तीन ते प्लस मायनस पाच टक्के आहे.