साध्वींच्या बलात्कार आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या या प्रकरणामध्ये सध्या शिक्षात भोगत असलेला  गुरमीत राम रहीम सिंह आता आणखी एका प्रकरणामध्ये दोषी ठरला आहे. राम रहिम डेऱ्याचा मॅनेजर रणजीत सिंहच्या हत्याकांड प्रकरणात राम रहीमला दोषी ठरवण्यात आले आहे, आज पंचकुलाच्या सीबीआय कोर्टाने हा निकाल सुनावला आहे. 


12 ऑक्टोबरला सुनावली जाणार शिक्षा
2002 साली डेरा मॅनेजर रणजीत सिंह यांची गोळी मारून त्यांच्या गावामध्ये हत्या करण्यात आली. सीबीआय कोर्टाकडून राम रहिमला कलम 302 आणि 120 B नुसार दोषी सुनावण्यात आले आहे. या प्रकरणी चार दिवसांनंतर म्हणजेच  12 ऑक्टोबर रोजी राम रहिमला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. राम रहिम सध्या हरियाणामधील रोहतकच्या सुनरीया जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.  
 
डेऱ्याचा मॅनेजर आणि राम रहिमचा भक्त होता रणजीत सिंह
रणजीत सिंह हा हत्या प्रकरण सीबीआयच्या स्पेशल कोर्टामध्ये सुरू आहे. रणजीत सिंह राम रहिमच्या डेऱ्याचा मॅनेजर आणि भक्त होता. 10 जुलै 2002 मध्ये त्याची  गोळी मारून हत्या करण्यात आली. या प्रकरणात राम रहिमसोबत  कृष्ण लाल देखील अडकला होता. 
 
राम रहिमला सीबीआय कोर्टाने दोन साध्वींच्या बलात्कार प्रकरणी 20 वर्ष शिक्षा सुनावली आहे.  तसेच राम रहिमला पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्ये प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. सीबीआयने 3 डिसेंबर 2003 रोजी रणजीत सिंह हत्या प्रकरणात एफआयआर नोंदवला होता. रणजीत सिंग यांचा मुलगा जगसीर सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती.


जाणून घ्या कोण आहे हनीप्रीत 
राम रहीमसोबत हनीप्रीतचे नाव अनेक वेळा घेतले जाते. असे म्हणले जाते की हनीप्रीत ही राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. तसेच राम रहीमची सर्व माहिती हनीप्रीतला माहित असते. हनीप्रीतला ऑक्टोबर 2017 मध्ये पंचकूला कोर्टाच्या बाहेर झालेल्या हिंसा प्रकरणात  अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये तिला जामिन मिळाला.