एक्स्प्लोर

एबीपी सर्व्हे : उत्तराखंडमध्ये कुणाची सत्ता येणार?

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी 15 फेब्रुवारीला मतदान होणार असून 11 मार्चला नवीन सरकार सत्तेत येणार आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस आपला गड राखणार का, किंवा भाजपचं कमळ पुन्हा एकदा फुलणार का?, हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नांचं उत्तर जाणून घेण्यासाठी एबीपी-लोकनिती-सीएसडीएस यांनी ओपिनियन पोल घेतला आहे. कुणाला किती मतं मिळणार? एबीपी-लोकनिती-सीएसडीएस यांच्या सर्व्हेनुसार काँग्रेसला 36 टक्के, तर भाजपला 39 टक्के मतदारांचं समर्थन आहे. तर बसपाला 6 टक्के आणि इतरांना 19 टक्के मतदारांचं समर्थन असेल. मुख्यमंत्रीपदाची पहिली पसंत कोण? एबीपी-लोकनिती-सीएसडीएस यांच्या सर्व्हेत मुख्यमंत्री म्हणून हरीश रावत सर्वात लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर ते जानेवारी या काळात हरीश रावत यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली आहे. 31 टक्के मतदारांना मुख्यमंत्री म्हणून हरीश रावत हवे आहेत, तर 14 टक्के मतदारांनी बी. सी. खंडुरी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. निवडणुकीचा मुद्दा सर्व्हेनुसार उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीसाठी विकास हाच एकमेव मुद्दा आहे. 33 टक्के मतदारांच्या म्हणण्यानुसार विकास हा निवडणुकीचा मुद्दा आहे. तर 16 टक्के मतदारांनुसार बेरोजगारी हा निवडणुकीचा मुद्दा आहे. कोणत्या पक्षाला किती जागा? सर्व्हेमध्ये मतदारांशी बातचीत करुन जी टक्केवारी जमा करण्यात आली, त्याचं आकडेवारीमध्ये रुपांतर केलं तर भाजपला 32 ते 40 जागा, काँग्रेसला 24 ते 32 जागा आणि इतर पक्षांना 3 ते 9 जागा मिळू शकतात, अशी आकडेवारी सर्व्हेमध्ये समोर आली आहे. सर्व्हे कसा झाला? एबीपी-लोकनिती-सीएसडीएसने 15 जानेवारी ते 20 जानेवारी या काळात उत्तराखंडच्या जनतेची मतं जाणून घेतली. 20 विधानसभा क्षेत्रातील 98 मतदान केंद्रांवरील 1 हजार 845 मतदारांशी बातचीत करण्यात आली. हा सर्व्हे युरोपियन सोसायटी फॉर ओपिनियन अँड मार्केटिंग रिसर्च म्हणजे ESOMAR यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koel Mallick: तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
तृणमूलच्या आणखी एका राज्यसभा खासदाराचा राजीनामा; चार महिन्यांपूर्वीच नियुक्ती, भाजप नेत्याची सुद्धा घेतली भेट
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
Embed widget