ABP C-Voter Survey : सध्या सर्वच राजकीय पक्षांनी 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. सर्वच पक्ष आपापल्या पातळीवर रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसनं आपला गमावलेला जनाधार मिळवण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो पद यात्रा सुरू केली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी भेटीगाठींचं सत्र सुरु केलं आहे. अशा परिस्थितीत देशाचा मूड जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजनं सी-व्होटर्ससह एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्व्हेमध्ये देशातील जनतेनं कोणते प्रश्न विचारले आहेत, ते जाणून घेऊया.


प्रश्न :  मद्य घोटाळ्यात छापेमारीमुळे 'आप'ला फायदा की, नुकसान? 


फायदा : 40%
नुकसान : 42%
काहीच फरक पडणार नाही : 18%


प्रश्न : जात आणि धर्माच्या मुद्दा भाजपसाठी फायदेशीर ठरेल? 


हो : 60%
नाही : 40%


प्रश्न : नितीश कुमार विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात यशस्वी होतील? 


हो : 44%
नाही : 56%


नितीश कुमार पंतप्रधान पदाचे उमेदवार बनले, तर भाजपला फायदा की नुकसान? 


फायदा : 53%
नुकसान : 47%


गांधी कुटुंबा बाहेरील व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष झाल्यानं पक्षाला फायदा होणार की, नुकसान? 


फायदा : 64%
नुकसान : 36%


भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला निवडणुकीत फायदा होईल? 


हो : 50%
नाही : 50%


उत्तर प्रदेशातील मदरशांचा सर्व्हे योग्य की, अयोग्य? 


हो : 69%
नाही : 31%


उत्तर प्रदेशप्रमाणेच देशभरातील मदरशांचाही सर्व्हे होणं गरजेचं? 


हो : 75%
नाही : 25%


टीप : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेबाबत एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरनं सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये 6,222 लोकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. सर्व्हेचे निष्कर्ष लोकांच्या वैयक्तिक मतांवर आधारित आहेत. त्याचा एबीपी न्यूजशी काहीही संबंध नाही. सर्व्हेतील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ने प्लस मायनस 5 टक्के आहे.