नवी दिल्ली : एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे  (Avinash Pandey) यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला असून त्यांची इंटरनॅशनल अॅडव्हरटायझिंग असोसिएशनच्या (International Advertising Association- IAA) इंडिया चाप्टरच्या अध्यक्षपदी (President) निवड झाली आहे. त्यांची ही निवड 2022-23 या सालासाठी झाली असून त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जातोय. इंटरनॅशनल अॅडव्हरटायझिंग असोसिएशन या संस्थेला 80 वर्षांचा इतिहास असून त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी आहे. 


अविनाश पांडे यांची या आधी न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन (News Broadcasters & Digital Association) अर्थात एनबीडीएच्या (NBDA) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. इंटरनॅशनल अॅडव्हरटायझिंग असोसिएशन या जुलै महिन्यात अविनाश पांडे यांना 'मीडिया पर्सन ऑफ द ईयर' हा पुरस्कार देऊन गौरव केला होता. 


फ्री प्रेस जर्नल ग्रुपचे संचालक अभिषेक कर्णानी यांची आयएएच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर नंदिनी डायस मीडियाचे सचिव जयदीप गांधी यांची निवड खजिनदार म्हणजे कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे. 


ही निवड करण्यासाठी एका समितीची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये श्रीनिवास के स्वामी, श्रेयम कुमार, प्रशांत कुमार, अनंत गोएंका आणि जनक सारडा यांचा समावेश होता. 


एनबीडीएच्या अध्यक्षपदी निवड 


एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे यांची या आधी न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन (News Broadcasters & Digital Association) अर्थात एनबीडीएच्या (NBDA) अध्यक्षपदी (President) निवड करण्यात आली आहे. याआधी त्यांनी एनबीडीएचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला असून आता त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 


NBDA च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अविनाश पांडे म्हणाले की, ''सध्या न्यूज इंडस्ट्री ज्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आहे, त्या काळात अध्यक्षपद मिळणं ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. रजत शर्मा यांनी आतापर्यंत आमचे ज्याप्रकारे नेतृत्व केले त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो. यापुढेही आम्ही सर्व बोर्डाचे सदस्य मिळून समाजासाठी योग्य काम नक्कीच करु.''  


कोण आहेत अविनाश पांडे?


अविनाश पांडे हे 2005 सालापासून ABP समुहामध्ये विविध भूमिका बजावत आहेत. अविनाश पांडे यांनी जानेवारी 2019 मध्ये एबीपी नेटवर्कच्या सीईओ पदाचा पदभार सांभाळला असून त्यांना न्यूज मीडियामध्ये तब्बल 26 वर्षांचा अनुभव आहे. आता त्यांची IAA च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.