एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 16/03/2017
- कर्जमाफी केल्यास एकही आत्महत्या होणार नाही याची हमी देणार का?, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल, सरकार कर्जमाफीच्या बाजूने मात्र विकासकामांना पैसे पुरणार नसल्याचं मत https://gl/Urz5sZ
- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सकाळी 7 वाजता पंढरपुरातील शेतकऱ्यांच्या बांधावर, गारपीटग्रस्त शेतीचे 24 तासात पंचनामे करण्याचे आदेश https://gl/6Ez4pq
- मराठवाड्यानंतर विदर्भातही अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली https://gl/6osrGF तर मराठवाड्यात वीज कोसळून सहा जणांचा बळी https://goo.gl/SWGVFn
- गोव्यात भाजपकडून बहुमत सिद्ध, 22 विरुद्ध 16 ने विश्वासदर्शक ठराव जिंकला, राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराचा भाजपला पाठिंबा https://gl/HgMexV तर काँग्रेसचे विश्वजीत राणे यांचा पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा, वालपोई मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणार
- काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह पंजाबचे नवे मुख्यमंत्री, तर माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू कॅबिनेट मंत्री https://gl/S0bulP
- गोवा आणि मणिपूरमधील फजिती काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी, राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रिया दत्त, मणिशंकर अय्यर यांचं प्रश्नचिन्ह, पक्षात नव्यानं घमासान https://gl/QPv34e
- केंद्रात मनोहर पर्रिकरांच्या जागी कोणाला संधी, नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात एप्रिलमध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत https://gl/bOLcKV
- मार्क झुकरबर्गने कौतुक केलेल्या आयटी तज्ज्ञाची नाशकात आत्महत्या, कौशल बागच्या निधनाने हळहळ, 2015 च्या चेन्नई पुरात अडकलेल्या प्रवाशांसाठी कौशलचं अॅप ठरलं होतं देवदूत https://gl/7pCc1d
- घर खरेदीसाठी पीएफमधील 90 % रक्कम काढता येणार, लवकरच नवा नियम, मात्र 10 सदस्यांच्या सोसायटीची अट https://gl/kRlFiq
- केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ, 50 लाख कर्मचारी, पेन्शनर्सना फायदा, पुढील वर्षापासून वाढीव भत्ता https://gl/dfcSjh
- 1 वर्षापेक्षा लहान बाळ दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या विशेष मातृत्व रजेत दुपटीने वाढ, आता 90 ऐवजी 180 दिवसांची रजा https://gl/5KzHvP
- लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीसाठी नवीन ईव्हीएम खरेदीला केंद्राची मंजुरी, मतदानानंतर आता पावतीही मिळणार https://gl/THa6k2
- मोबाईलमध्ये बघत चालणाऱ्या तरुणाला बसची जोरदार धडक,कर्नाटकच्या मंगळुरुतील अपघात सीसीटीव्हीत कैद https://gl/fp7PmK
- बहुप्रतीक्षित 'बाहुबली 2' चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पाहण्यासाठी चाहत्यांच्या यू ट्यूबवर उड्या, अल्पावधीतच 50 लाख हिट्स https://gl/OIk1yD
- भारताविरुद्धच्या रांची कसोटीत ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत, कर्णधार स्मिथचं दणदणीत नाबाद शतक, मॅक्सवेलची शतकाकडे कूच, दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 4 बाद 299 धावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement