एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/05/2017
![एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/05/2017 Abp Majha Whatsapp Bulletin 10052017 एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/05/2017](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/18184714/Whatsapp_Bulletin-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
- यंदा देशात 96 ऐवजी 100 टक्के पाऊस, चांगल्या पावसाच्या अंदाजानं शेअर बाजार तेजीत, शेतकऱ्यांनाही दिलासा, तर 15 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची चिन्हं https://gl/Z5BGRX
- राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली तरी रडतात XXX , रावसाहेब दानवे पुन्हा बरळले, कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना घसरले https://gl/RhrRbr
- राज्याला स्वाईन फ्लूचा विळखा, चार दिवसात दहा जणांचे बळी, साडेचार महिन्यांतील मृतांचा आकडा 181 वर https://gl/mn34sM
- कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय कोर्टाची स्थगिती, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, तर भारताची पहिली चाल यशस्वी, अॅड. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया https://gl/h0BBGf
- विवाह सोहळ्यातून अपहरण, 5 महिन्यापूर्वी रुजू झालेल्या 22 वर्षीय लेफ्टनंटची दहशवाद्यांकडून हत्या, उमर फयाझ यांच्या मृत्यूने काश्मीरमध्ये हळहळ
- राज्यभरातील शाळांच्या फी वाढीविरोधात पालकांचा संताप, शिक्षणमंत्री विनोद तावडेंना पुण्यात घेराव, पुन्हा सुनावणीचं मंत्र्यांचं आश्वासन https://gl/J2DK7i
- गेल्या वर्षी 'काटा रुते कुणाला', यावर्षी 'काटा लगा', कथित नालेसफाई घोटाळ्यावरुन आशिष शेलारांनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं
- "बापट साहेब कुणीही रागावणार नाही, परत या", पुण्यात काँग्रेसची पोस्टरबाजी, कचराकोंडीवरुन निशाणा https://gl/TISnHU
- मालवण किल्ल्याकडे शासनाचं दुर्लक्ष, म्हणून लक्ष वेधण्यासाठी किल्ला विक्रीला काढल्याचा उपरोधिक बोर्ड, रहिवाशाचा दावा, संतप्त स्थानिकांकडून मालवण बंदची हाक https://gl/0VayZq
- सुप्रीम कोर्टात आता ऑनलाईन याचिका दाखल करता येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुविधेचं लोकार्पण https://gl/7z5Qli
- नोटाबंदीच्या काळातील 342 कोटी स्वीकारा, अन्यथा राजीनामा घ्या, नाशिक जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडेंचा सरकारला इशारा https://goo.gl/o6Ikz9
- केवळ धनगर मतांमुळे मी मंत्री नाही, महादेव जानकरांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे रासपच्या 62 कार्यकर्त्यांचे राजीनामे https://gl/czCUc6
- 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट'चा प्रमुख कोण?, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी मुलाखती सुरु, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांच्या अध्यक्षतेखालील समिती कुलगुरुंची निवड करणार https://gl/cqJYo6
- कॅनडियन पॉपस्टार जस्टिन बिबरच्या कॉन्सर्टसाठी नवी मुंबईत गर्दी, देशभरातील चाहते डी वाय पाटील स्डेडियमवर, बीड ते बांद्रा बिबरचा फिव्हर https://gl/kl13pt
- जस्टिन बिबरचा 'बेबी' यूट्यूबच्या इतिहासातील डिसलाईक व्हिडीओत अव्वल, डिसलाईकचा आकडा 76 लाखांवर https://gl/1pOQlZ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)