ABP C Voter Survey On Opposition Meeting: भाजप (BJP) विरोधकांसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. भाजप विरोधकांची आज दुसरी बैठक बंगळुरूमध्ये (Bengaluru) होतेय. बंगळुरूमधील ताज वेस्ट एंड हॉटेलमधील या बैठकीत तब्बल 26 विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. 11 वाजता बैठक सुरू होईल आणि अंदाजे 4 वाजता संपेल. त्यानंतर सर्व विरोधक एकत्र पत्रकार परिषद घेतील. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात कोणती रणनीती आखायची, किमान समान कार्यक्रम तसेच उमेदवार कसे द्यायचे? यावर चर्चा अपेक्षित आहेत. यापूर्वी पाटण्याच्या झालेल्या विरोधकांच्या बैठकीत 15 पक्ष सहभागी झाले होते तर यावेळी 26 पक्ष सहभागी झाले आहेत.


2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तयारीसाठी विरोधी पक्षांची बंगळुरूमध्ये बैठक होत आहे. यापूर्वी सी-व्होटरनं याबाबत जलद सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात विचारण्यात आलं की, विरोधी पक्षांना जोडण्यासाठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची सक्रियता विरोधी पक्षांना बळ देईल का? या प्रश्नावर अतिशय आश्चर्यकारक उत्तरं मिळाली आहेत. या सर्वेक्षणात सहभागी 51 टक्के लोकांनी होय सोनिया गांधींची सक्रियता भाजप विरोधी पक्षांना नक्कीच बळ देईल असं म्हटलं आहे. तर 39 टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिलं आहे. पण 10 टक्के लोकांनी माहित नाही, असं उत्तर दिलं आहे. 


स्रोत : सी वोटर


हो : 51 टक्के 


नाही : 39 टक्के 


माहित नाही : 10 टक्के 


गेल्या काही वर्षांत फारशा सक्रिय नव्हत्या सोनिया गांधी 


काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी राजकारणात गेल्या काही वर्षांपासून फारशा सक्रिय नव्हत्या. दरम्यान, आता त्यांना पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळू शकतं. सोनिया गांधी जेवढ्या आधी राजकारणात सक्रिय होत्या, तेवढ्या गेल्या काही वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होत्या. 


विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी सोनिया 'अॅक्शन मोड'मध्ये


भारत जोडो यात्रा असो वा निवडणूक प्रचार सोनिया गांधी फारशा सक्रिय नव्हत्या. दरम्यान, सोनिया गांधी यांची प्रकृती हेदेखील यामागील प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातं. परंतु, विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सोनिया गांधींनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आणि आता त्या हळूहळू अॅक्शन मोडमध्ये येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


टीप: सी-व्होटरनं एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणाचे निकाल पूर्णपणे लोकांशी झालेल्या संवादावर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. सर्वेक्षणात 4 हजार 29 लोकांशी बोलणं झालं आहे. गेल्या आठवड्यात सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणात मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. या सर्वेक्षणातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ajit Pawar Meets Sharad Pawar: चार दिवसांत तिनदा भेट... थोरल्या पवारांकडून नेमकं काय हवंय अजित पवारांना?