एक्स्प्लोर
LIVE : शिर्डीः साईबाबांना पुण्यतिथी निमीत्ताने भरभरून दान
रायगड : भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या जवानाची महाडमध्ये छातीत गोळी झाडून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट, राजेश बाळकृष्ण पिलावरे (वय - 33 वर्षे) असे जवानाचं नाव
---------------
श्रीनगरमध्ये जकुरा परिसरात सशस्त्र सीमा दलाच्या गाडीवर दहशतवादी हल्ला, दहशतवाद्यांच्या गोळीबारात 4 जवान जखमी
---------------
शिर्डीः साईबाबांना पुण्यतिथी निमीत्ताने भरभरून दान, दसऱ्याच्या मुहूर्तावर चार दिवसात साईबाबांना 3 कोटी 75 लाखांचं दान
---------------
लातूरमध्ये 150 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा, विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु, सलगरा येथील जिल्हा परिषदच्या शाळेतील घटना
---------------
लातूर : महाराष्ट्राला कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगानाला माचनाळ गावाजवळील निजामकालीन पूल खचला, या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून.. पाऊस थांबल्यानंतर आठवड्याभरातच पूल कोसळला
---------------
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाकणीजवळ टँकर आणि बोलेरो जीपचा भीषण अपघात, पाच जण ठार
----------------
मुंबई: कपडा बाजार दोन दिवस बंद राहण्याची शक्यता, गुमास्ता कामगार संघटनेचा आज, उद्या बंदचा इशारा, शासकीय नियमानुसार वेतन देण्याची मागणी
------------------
1 पाकिस्तान लष्करानं दिली चंदू चव्हाणच्या ताब्याची कबुली, भारतीय डीजीएमओशी पाक लष्कराच्या अधिकाऱ्यांची चर्चा, चंदूला परत आणण्यासाठी हालचालींना वेग
----------------
2 मराठा मोर्चातील मागण्यांची मुख्यमंत्र्यांकडून दखल, फर्स्ट क्लास मिळवणाऱ्यांना 6 लाखांपर्यंतची ईबीसी सवलत, तर व्यावसायिक शिक्षणासाठी अनेक योजना
-------------
3 मराठा आरक्षणावर प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर नाही, सरकारवर चालढकलीचा आरोप, मराठा आरक्षणाची पुढची सुनावणी आता 7 डिसेंबरला
-----------------
4 तळेगावातील अत्याचार घटनेनंतर नाशकात 250 कोटींचं नुकसान, तर नाशिक आणि परिसरातील इंटरनेट आजही बंद
-----------------
5 मुंबईतल्या अनधिकृत बांधकामानं घेतला सहा जणांचा बळी, वांद्र्यातील बेहराम पाड्यातली 4 मजली इमारत कोसळली, ढिगारा उपसण्याचं काम सुरू
--------------
6 दौंड ते कोपरगावदरम्यान रेल्वेच्या प्रवाशांची मारहाण करुन लूट, पुणे- गोरखपूर ज्ञानगंगा एक्सप्रेसमधील जनरल डब्यातली घटना
------------------
7 नागरी समान कायद्याला मुस्लिम लॉ बोर्डाचा विरोध, तोंडी तलाख प्रथा इतिहासजमा होण्याची बोर्डाला भीती, भाजपची सावध प्रतिक्रिया
--------------
8 धनंजय मुंडेंचे वडील पंडित अण्णा मुंडेंचं निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली, पंडित अण्णा मुंडेंच्या पार्थिवावर परळीत आज अंत्यसंस्कार
------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement