एक्स्प्लोर
LIVE : पुण्यात पावसाच्या हलक्या सरी

हेडलाईन्स पुण्यात पावसाच्या हलक्या सरी ------------------ सातारा : वेण्णा नदीमध्ये इथेनॉलचा टँकर कोसळला, शेकडो मासे मृत, पाचगणीचा पाणी पुरवठा बंद ------------------ उत्तराखंड : बहुमत चाचणीत हरीश रावत यांना यश, काँग्रेसला 33 मतं, राष्ट्रपती राजवट हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश ------------------ दुष्काळ, विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पक्ष कार्यालयात बैठक सुरु ------------------ अमरावती : प्रसुतीदरम्यान आई आणि बाळाचा मृत्यू, मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून डॉ. वासंती कडू यांच्या रुग्णालयाची तोडफोड ------------------ 1. आत्महत्येचा प्रयत्न करणारे नवी मुंबईतील बिल्डर राज कंदारींचा अखेर मृत्यू, सरकारी यंत्रणेच्या अडवणुकीचे बळी ठरल्याची चर्चा ------------------ 2. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता, रावसाहेब दानवेंनी घटकपक्षाची बैठक बोलावली, मित्रपक्षांचं चर्चेकडे लक्ष ------------------ 3. राज्यात पुढील पाच दिवसात पावसाची शक्यता, विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान खाताचा अंदाज ------------------ 4. युपीएससीत दिल्लीची टीना डाबी अव्वल, तर योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला, जालन्यातील रिक्षाचालकाचा मुलगा अन्सार शेख 21व्या वर्षी आएएस ------------------ 5. नीटसंदर्भात राज्य सरकारचा अखेरचा प्रयत्न, सीईटी झालेल्या राज्यांना वगळ्यासाठी सुप्रीम कोर्टात पुन्हा पुनर्विचार याचिका, तावडेंविरोधात पालकांची तक्रार --------------------- 6. उत्तराखंडच्या सत्तेची धुरा पुन्हा काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता, बहुमत चाचणीत 38 मतं मिळाल्याचा काँग्रेसचा दावा, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष --------------------- 7. मुंबईतील आठ डान्सबारना दोन दिवसात परवाने द्या, सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश, सरकारच्या भूमिकेवर कोर्टाची नाराजी --------------------- 8. बॉक्स ऑफिसवर 'सैराट' सुसाट, सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट, 11 दिवसांत 41 कोटींचा गल्ला, नटसम्राटचा रेकॉर्ड मोडला --------------------- 9. शशांक मनोहर यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, आयसीसीच्या चेअरमनपदाची निवडणूक लढवण्यासाठी निर्णय --------------------- एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा























