एक्स्प्लोर
LIVE : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा छापणारा डॉक्टर गजाआड

हेडलाईन्स: कोल्हापूर: बनावट नोटा छापणारा डॉक्टर गजाआड, दोन हजारांच्या नोटा छापणारा डॉक्टर सुधीर कांबळे पोलिसांच्या ताब्यात ------------------ 1. काळा पैसेधारकांना आरबीआयचा नवा दणका, नोटाबंदीनंतर दोन लाखांपेक्षा जास्त जमा केलेली रक्कम पॅन नंबर किंवा फॉर्म 60 शिवाय काढता येणार नाही 2. पुढील 15 दिवसात चलनकल्लोळ दूर होणार, सरकारचा दावा, तर टिळकनगरमध्ये 10 लाखांच्या नव्या नोटांसह 10 कोटींची रोकड जप्त 3. प्रस्तावित मुंबई-नागपूर महामार्गालगतच्या जमिनी आजी-माजी अधिकाऱ्यांच्या खिशात, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश 4. नोटाबंदीच्या गोंधळानं अख्खं संसद अधिवेशन पाण्यात, आज शेवटचा दिवस, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर राहुल पंतप्रधानांना भेटण्याची शक्यता 5. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं; खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा 6. भारत आणि इंग्लंड संघांमधली पाचवी कसोटी आजपासून चेन्नईत, टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजयासाठी प्रयत्न
आणखी वाचा























