एक्स्प्लोर
LIVE: अध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवेंचं काम अतिशय उत्तम: मुख्यमंत्री
![LIVE: अध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवेंचं काम अतिशय उत्तम: मुख्यमंत्री Aaj Dinak Headline 06 June 2016 LIVE: अध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवेंचं काम अतिशय उत्तम: मुख्यमंत्री](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/15073000/Aaj-Dinank-Headlines-News-2-580x39512-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
हेडलाईन्स :
अध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवेंचं काम अतिशय उत्तम: मुख्यमंत्री
विरार रेल्वे स्थानकावर हत्या प्रकरण; न्यायालयाच्या आवारातून आरोपी फरार
कल्याण : निवृत्त पोलिस अधिकारी नारायण भानुशाली यांची गोळी घालून आत्महत्या, आधारवाडी चौकातील रॉयल रेसिडेंसीमधील घटना
-----------------------
जळगाव : आम आदमी पक्षाच्या प्रिती मेनन यांच्याविरोधात भाजपकडून न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा
-----------------------
1. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी जीवित आणि वित्तहानी
2. दहावीचा ऑनलाईन निकाल आज जाहीर होणार, विद्यार्थ्यांसह पालकांची धाकधूक वाढली, 15 जूनला गुणपत्रिका मिळणार
3. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचं सत्र सुरुच, शेडूंग फाट्यावर बसची कारला धडक, बस खड्ड्यात उलटून 17 जणांचा मृत्यू
4. जळगावमध्ये शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांची खडसेंवर उपरोधिक टीका, खडसेंच्या राजीनाम्यानंतर 14 नगरसेवकांचे राजीनामे, रामटेक बंगल्यावरही समर्थकांची वर्दळ
5. " ताकही फुंकून प्या", राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांचा सल्ला, खडसेंच्या मोबाईल बिलाबाबतच्या वक्तव्याचा आवर्जून दाखला
6. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक उलटल्याने दारुची तस्करी उघड, उलटलेल्या ट्रकमधून 40 लाखांची अवैध दारू जप्त
7. काँग्रेसची धुरा राहुल गांधींच्याच हातात येणार, जयराम रमेश यांचं सूचक वक्तव्य, अधिकृतरित्या राहुल गांधींना पक्षाध्यक्षपद सोपवण्याची मागणी
8. कॉमेडी किंग कपिल शर्मालाही सैराटचं याड लागलं, कपिलच्या घरात टीम सैराटचं झिंग झिंग झिंगाट, सैराटची कमाई 100 कोटींच्या दिशेनं
9. किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेकाचा सोहळा रंगणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, हजारो शिवप्रेमींची रायगडावर हजेरी
10. गुंटूरमध्ये वानरसेनेचा सराफ दुकानावर दरोडा, मालकादेखत नोटांचं बंडल पळवून माकड फरार, सीसीटीव्हीत मर्कटलीला कैद
एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर 'वर्षा' बंगल्यावर आज भाजप कोअर कमिटीची बैठक, मुख्यमंत्री, दानवे, तावडे, मुनगंटीवार,व्ही सतीश यांचा सहभाग, खडसेही उपस्थित राहण्याची शक्यता
-----------------------
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
शिक्षण
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)