एक्स्प्लोर

Aaditya Thackeray In Uttar Pradesh : फडणवीस सरकारमध्ये असल्याचे दु:ख ; आदित्य ठाकरेंची कबुली

Aaditya Thackeray Rally In Uttar Pradesh : शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोरखपूरमध्ये प्रचारसभा घेतली.

Aaditya Thackeray Rally In Uttar Pradesh : महाराष्ट्रात मागील सरकारच्या कार्यकाळात काही चुकीच्या गोष्टी घडल्या. त्या सरकारमध्ये भाजपसोबत असल्याचे दु:ख वाटत असल्याचे कबुली महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दिली. उत्तर प्रदेशमधील शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवरही टीका केली. सध्याचे मुख्यमंत्री हे निवडणुकीनंतर माजी मुख्यमंत्री होतील असा टोलाही त्यांनी लगावला. 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेने आपले उमेदवार उतरवले आहेत. शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांनी गोरखपूरमध्ये सभा घेतली. या वेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, उत्तर प्रदेशमध्ये द्वेषाचे राजकारण नको. प्रत्येक वेळी इथे लोकांना भीती दाखवली जाते. मात्र, प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत घाबरायचं कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा मोर्चा आला होता. या मोर्चाला बदनाम करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या हाती लाल झेंडे असल्याने त्यांना नक्षलवादीदेखील संबोधले. त्या सरकारमध्ये आम्ही होतो. त्याचे दु:ख वाटते. काही चुकीचे निर्णय घेण्यात आले होते, असेही आदित्य यांनी म्हटले. 

कोरोनावरून केंद्रावर टीका

कोरोना काळात केंद्र सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलपणावर आदित्य ठाकरे यांनी टीका केली. कोरोना काळात लॉकडाउनमध्ये मुंबईत असणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांना पुन्हा गावी जायचे होते. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने वारंवार केंद्र सरकारकडे केली. मात्र, त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. दोन महिन्यांनी केंद्र सरकारने ट्रेन सोडल्या. मात्र, त्यासाठीदेखील तिकिट आकारणी केली. या तिकिटांचे पैसे राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीतून भरले असल्याचेही आदित्य यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील नागरिकांची महाराष्ट्रात शिवसेनेने काळजी घेतली असल्याचे त्यांनी म्हटले. 

उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार: आदित्य ठाकरे

उत्तर प्रदेशात परिवर्तन करण्याची हाक यावेळी आदित्य यांनी दिली. उत्तर प्रदेशात रोजगार, महिलांना सुरक्षिता मिळायला हवी असेही त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असून सध्याचे आजी मुख्यमंत्री काही दिवसांनी माजी मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
Maharashtra Live blog updates: रायगडमध्ये भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस पाटलाला तरुणांकडून बेदम मारहाण
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
Nitin Gadkari on Ethanol: इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
इथेनॉलमुळे पेट्रोल-डिझेल आयात करणारी लॉबी माझ्यावर नाराज, माझ्याविरोधात पेड कँपेन चालवलं जातंय: नितीन गडकरी
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
Embed widget