एक्स्प्लोर
ट्रेनमध्ये शुभमंगल! आठ दिवसांचा राजेशाही प्रवास, किंमत...

मुंबई : डेस्टिनेशन वेडिंग हे सध्या अनेक विवाहोच्छुक जोडप्यांचं स्वप्न असतं. मात्र एकाच वेळी अनेक डेस्टिनेशन्सना भेट देत आयुष्याचा प्रवास हा प्रवासाने सुरु करण्याची संधी भारतीय रेल्वे देत आहे. 'वेडिंग ऑन व्हिल्स' या संकल्पनेसह महाराजा एक्स्प्रेसमधून शाही विवाहसोहळा पार पाडता येणार आहे. राजेशाही लग्नसोहळ्यासाठी साडेपाच कोटी रुपये मोजण्याची तुमची तयारी असेल, तर आठ दिवसांचा हा प्रवास खास तुमच्यासाठी आहे. आयआरसीटीसीने वधू-वर आणि वऱ्हांडीसाठी हा सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी चंग बांधला आहे. महाराजा एक्स्प्रेसमध्ये 88 प्रवाशांसाठी आठ दिवसांचं लक्झरी वेडिंग पॅकेज उपलब्ध करुन देण्यात येईल. मुंबई ते दिल्ली हा प्रवासाचा मार्ग असेल. या प्रवासात अजंठा, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, जयपूर, रणथंबोर, ग्वाल्हेर, लखनऊ, वाराणसी, खजुराहो आणि आग्रा यांचा समावेश असेल. ट्रेनला 24 कोच असून त्यात 43 गेस्ट केबिन्स आहेत. यापैकी 20 डिलक्स, 18 ज्युनिअर सु्ट्स, चार सुट्स आणि एका प्रेसिडेंशियल सुटचा समावेश आहे. प्रत्येक सुटची किंमत 6 हजार 840 डॉलर्स (अंदाजे साडेचार लाख रुपये) पासून 23 हजार 700 डॉलर्स ( अंदाजे 15.8 लाख रुपये) या घरात आहे.
Before You Go
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















