एक्स्प्लोर

ड्रायव्हरची आत्महत्या, जनार्दन रेड्डींनी त्रास दिल्याचा आरोप

बंगळुरु : कर्नाटक प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याच्या ड्रायव्हरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांनी त्रास दिल्याचा आरोप ड्रायव्हर रमेश गौडा याने सुसाईड नोटमध्ये केला आहे. बंगळुरुतील विशेष भूसंपादन अधिकारी भीमा नायक यांचा चालक रमेश गौडाने विषप्राशन करुन आयुष्य संपवलं. 'जनार्दन रेड्डी यांनी 100 कोटी रुपयांचा काळा पैसा कशाप्रकारे पांढरा केला, याची माहिती आपल्याला होती. भीमा नायक यांनाही रेड्डींना मदत केल्याबद्दल 20 टक्के वाटा मिळाला होता' असा दावा सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. भीमा नायक आणि त्यांचा दुसरा ड्रायव्हर मोहम्मद यांच्याविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. अवैध खाणकाम प्रकरणी साडे तीन वर्षे तुरुंगवास भोगलेले जनार्दन रेड्डी यांनी मुलीच्या शाही विवाह सोहळ्यात तब्बल 500 कोटींची उधळण केली होती. त्यानंतर रेड्डी यांच्या कार्यालयावर आणि घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. विशेष तपास पथक (एसआयटी) आणि आयकर विभागाने मारलेल्या एका छाप्यात महत्त्वाची कागदपत्र हाती लागल्याची माहिती आहे. एकीकडे देश नोटाबंदीच्या झळा सोसत असताना रेड्डी यांनी विवाह सोहळ्यावर केलेली कोट्यवधींची उधळण विरोधकांच्या डोळ्यात खुपत होती. त्यामुळे सरकारला टीकेचाही सामना करावा लागला होता. रेड्डी आणि भाजप खासदार बी श्रीरामुलू हे दोघे भीमा नायक यांना बंगळुरुतील एका हॉटेलमध्ये दोन वेळा भेटल्याचंही आत्महत्या करणारे रमेश गौडा यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी रेड्डींनी मदत करावी, अशी नायक यांची इच्छा असल्याचा दावाही सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

मुलीच्या लग्नासाठी भाजपच्या माजी मंत्र्याची 500 कोटींची उधळण!

माजी मंत्री जनार्दन रेड्डींच्या कार्यालयावर आयकर विभागाचा छापा

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Embed widget