India Corona Vaccination : नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाविरुद्धच्या (COVID19) लढ्याला भारतीय आरोग्य यंत्रना यशस्वीपणे तोंड देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशभरात लसीकरण (COVID19 vaccine) मोहिमेचा वेग वाढविण्यात आला आहे. देशात लसीकरणासाठी पात्र असलेल्या 50 टक्के म्हणजे निम्या लोकांचे लसीचे दोन्ही डोस (Corona Vaccination)पूर्ण झाल्याची माहीती काल केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय (Union Health Minister Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे. तर मांडविय यांनी आज देशातील एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या 85 टक्यांवर पोहोचल्याची माहिती दिली. 


आरोग्य मंत्रालयाच्या काल दिलेल्या माहितीनुसार, देशभरात कोविड-19 लसीचे (COVID19) )127 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत तर 47.71 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यातील 79.90 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 


कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी सध्या देशात 'हर घर पर दस्तक' म्हणजेच प्रत्येकाला घरी जाऊन कोरोनाची लस देण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी प्रत्येकाला घरी जाऊन लस देत आहेत.






लसीकरणात हिमाचल प्रदेश अग्रेसर  
देशात आतापर्यंत 127 कोटी नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले असताना हिमाचल प्रदेशच्या नावे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरलं आहे. राज्यातील सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम पहिला डोस देण्याचा विक्रमही हिमाचल प्रदेशच्या नावेच आहे. 


राज्यातील एकूण 53,86,393 प्रौढ नागरिकांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात हिमाचल प्रदेशने त्या राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला होता. आता एम्सकडून या राज्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. 


दरम्यान, भारतात सध्या 99,155 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णांच्या 1 टक्क्यांहून कमी आहेत, सध्या हे प्रमाण 0.29 टक्के आहे जे मार्च 2020 पासून सर्वात कमी आहेत.  गेल्या 24 तासांत 6,918 रुग्ण बरे झाले असून, देशभरात आतापर्यंत 3,40,60,774 रुग्ण बरे झाले आहेत.


संबंधित बातम्या 



Vaccine | लस खरेदीची आतापर्यंतची आकडेवारी सर्व तपशिलांसह सादर करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश


Covid 19 Vaccine : भारतात अशी सुरुये कोरोना लसीच्या साठवणीची तयारी