नवी दिल्ली : देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली. ज्याअंतर्गत मोठ्या स्तरावर कोरोना लसीकरणापूर्वी या लसीच्या साठवणीसाठी कशी तयारी करण्यात आली हे, याची माहिती देण्यात आली. केंद्रातील आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
है तय्यार हम....
भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात सध्याच्या घडीला Coronavirus covid 19 वरील लसीच्या साठवणीसाठी 29,000 कोल्ड चेन पॉईंट्स, 240 वॉक इन कूलर, 70 वॉक इन फ्रिजर, 45,000 आईस लाईन रेफ्रिजरेटर, 41,000 डीप फ्रिजर आणि 300 सोलार रेफ्रिजरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना लसीच्या साठवणीसाठी वरीलपैकी बरीच सामग्री राज्यांना देण्यात आली आहे. तर, उर्वरित सामग्री देण्याचं काम सुरु असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
राज्यांना देण्यात आली मार्गदर्शक तत्व...
केंद्राकडून कोरोना लसीसाठीच्या कोल्ड चेनसंदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वं केंद्राकडून आखून देण्यात आली आहेत. संबंधित राज्यांना यासाठीचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे. शिवाय महत्त्वाच्या सामग्री आणि यंत्रांच्या वापरासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलं असल्याची माहिती भूषण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
लसीकरणाच्या प्रक्रियेत असणार कोणाचा सहभाग?
देशभरात होणाऱ्या कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीरंही घेण्यात आली आहेत. मेडिकल ऑफिसर, वॅक्सिनेटर ऑफिसर, अल्टरनेटीव्ह ऑफिसर, कोल्ड चेन हॅन्डलर, सुपरवायझर, डेटा मॅनेजर, आशा सेविका यांना प्रत्यक्ष आणि डिजिटल स्वरुपातून यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. काही ठिकाणी ही सत्र अद्यापही सुरु आहेत.
Vaccination लसीकरण प्रक्रियेदरम्यान उदभवणारी आव्हानाची परिस्थिती आणि त्यावर मात करण्य़ासाठीही केंद्राकडून पथकांची आखणी करण्यात आली आहे. देशातील कोरोना लसीकरणासाठी आता अवघे काही महिने शिल्लक असल्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच लसीच्या साठवणीसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली.
Covid-19 Vaccine Operational Guidelines नुसार, वॅक्सिन कॅरिअर, वॅक्सिन वेल्स, आईस पॅक हे थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवण्याचे निर्देश आहेत. याशिवाय लसीकरणाच्या सत्राच्या शेवटी आईस पॅक आणि न वापरलेल्या लसी वॅक्सिन कॅरिअरच्या माध्य़मातून पुन्हा कोल्ड चेन पॉइंटपाशी पाठवण्यात येणार आहेत.
Covid 19 Vaccine : भारतात अशी सुरुये कोरोना लसीच्या साठवणीची तयारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Dec 2020 08:03 AM (IST)
मागील साधारण वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसनं देशापुढं बरीच आव्हानं उभी केली. अखेर आता देशात कोरोना लसीसंदर्भातील काही सकारात्मक संकेत मिळाले असून, या लसीच्या साठवणीसाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे. कशी सुरुये ही तयारी चला पाहूया....
प्रतिकात्मक छायाचित्र
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -