AK-203 Assault Rifles : भारत-रशिया यांच्यातील संबध अधिक दृढ होणार आहेत. कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन (Vladimar Putin) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट आज (6 डिसेंबर) होणार आहे. यावेळी काही महत्त्वाचे करार होणार असून यातील एक म्हणजे देशाच्या सैनिकांना एक नवं शस्त्र मिळणार आहे. ते म्हणजे एके-203 असॉल्ट रायफल (AK-203 Assault Rifles) ही नवी बंदुक भारतीय सैनिकांना मिळणार आहे. नुकताच भारत आणि रशिया यांच्यात हा करार झाला असून तब्बल  5 लाख‌ एके 203 रायफल्स तयार करणार आहेत. मेक इन इंडियाच्या अंडर उत्तर प्रदेशच्या अमेठी येथे ही निर्मिती केली जाणार आहे.  भारताचे रक्षामंत्री राजनाथ सिंह आणि रशियाच्या सर्गेई शोइगु यांनी या करारावर सह्या केल्या.


भारताने या एके-203 रायफलला 'एक रायफल, श्रेष्ट रायफल' अशी टॅगलाइन दिली आहे. या बंदुकींचा निर्माण अमेठीच्या कोरबा ओएफबी प्लांटमध्ये केला जाणार आहे. या रायफल्स तयारीसाठी एक नवी कंपनी तयार करण्यात आली असून 'इंडिया रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड' असं नाव देण्यात आलं आहे.


इन्सास रायफल्सची जागा घेणार 



या करारावर हस्ताक्षर केल्यानंतर रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, रशियाच्या या समर्थनाबद्दल भारत आभार मानू इच्छित आहे. या नव्या संबधातून आम्ही शांती, समृद्धी आणि स्थिरता आणण्याचा प्रयत्न करु. यावेळी शस्त्र आणि सैन्य सहयोगाबाबत महत्त्वाचे करार करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्रपति व्लादिमीर पुतिन यांनी या एके-203 रायफल्सच्या निर्माणासंबधी कोरबा प्लांटचं उदघाटन 2019 मध्येच केलं होतं. पण तांत्रिक अडचणीमुळे ते काम थांबलं जे आता पुन्हा सुरु करण्यात येत आहे.


संबंधित बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha