एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'पद्मभूषण'ने सन्मानित 83 वर्षीय वैज्ञानिकाचा संशयास्पद मृत्यू
83 वर्षीय वैज्ञानिक डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांनी विष पिऊन आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
कानपूर : 'पद्मभूषण'ने सन्मानित 83 वर्षीय वैज्ञानिक डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर कटियार निराश झाले होते, या धक्क्यातूनच त्यांनी विष पिऊन आयुष्य संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांना जवळपास वीस दिवसांपूर्वी रिजन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पत्नीच्या निधनानंतर त्यांची प्रकृती खालावली होती, त्यातच काकांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या पुतण्याने सांगितलं. मात्र कटियार यांनी विषप्राशन केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली, तेव्हा कटियार यांच्या भाच्याने खोलीत शोधाशोध करुन सुसाईड नोट सापडल्याचं सांगितलं.
गेल्या वर्षी आजारपणातून पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मानसिक स्वास्थ्य गमावलं होतं. त्यामुळे विष पिऊन त्यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार हे छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालय (सीएसजेएमयू) चे माजी कुलगुरु होते. एंझायमोलॉजी या विषयात त्यांनी नैपुण्य मिळवलं होतं. विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी 2003 मध्ये केंद्र सरकारने 'पद्मश्री' प्रदान करुन त्यांचा सन्मान केला होता. तर 2009 मध्ये त्यांना 'पद्मभूषण'ने गौरवण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement