एक्स्प्लोर

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक, आज दिवसभरात

7th April Headlines : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे.

7th April Headlines : आजच्या दिवसात अनेक महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज महत्वाची बैठक बोलवली आहे. त्याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करणार आहेत. तसेच इतर अनेक महत्वाच्या घटना घडणार आहेत. जाणून घ्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर आज महत्वाची बैठक 
गेल्या काही दिवसापासून मुंबई महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रूग्णांचे आकडे वाढत आहेत. त्या पार्श्वभुमीवर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.या बैठकीनंतर देशात काही निर्बंध लागु होणार का? लोकांना पुन्हा मास्क सक्तीचं पालन करावं लागणार का? या बैठकीत सर्व राज्यातील आरोग्य मंत्र्यांबरोबर ऑनलाईन संवाद साधणार आहेत. 10 आणि 11 एप्रिल रोजी केंद्र सरकारच्या निर्देषानुसार मॉकड्रील होणार आहे.
 
दरम्यान, राज्यातील अँक्टीव्ह रुग्णसंख्या संख्या 3 हजार 987 वर गेलीये. मुंबईनंतर सर्वाधिक पुण्यात रुग्णसंख्या, मुंबईत 1 हजार 268 अँक्टिव्ह रुग्ण तर पुण्यात 738 अँक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, पालघर, साताऱ्यात सर्वाधिक अँक्टिव्ह रुग्णसंख्या.

गज उत्सव-2023 चे उद्घाटन -

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, 7 एप्रिल 2023 रोजी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव-2023 चे उद्घाटन करतील.  त्यानंतर गुवाहाटी येथे त्या माउंट कांचनजंगा मोहीम-2023 ला हिरवा झेंडा दाखवतील.  त्याच दिवशी, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्या सहभागी होतील. 8 एप्रिल, 2023 रोजी, राष्ट्रपती, तेजपूर एअर फोर्स स्टेशनवर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानातून उड्डाण  करतील.

भारत गौरव ट्रेन दिल्लीवरुन रवाना होणार - 

आज दिल्लीवरुन भारत गौरव ट्रेन रवाना होणार आहे. ही डीलक्स एसी टूरिस्ट ट्रेन असेल. दिल्लीतील सफदरजंग रेल्वे स्थानकातून ही ट्रेन रवाना होईल...पुरुषोत्तम राम यांच्याशी संबंधित असणाऱ्या धार्मिक स्थळाच्या मार्गे जाणार आहे. ही ट्रेन 18 दिवस प्रवस करेल. आयोध्या, नंदीग्राम, सीतामढी, नेपाळमदील जनकपूर (राम-जानकी मंदिर).. या मार्गे काशीमध्ये पोहचणार आहे. आज या भारत गौरव ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. 
 
एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला मनमाड,  नांदगाव या भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रेल्वेने जाणार आहेत. ठाण्यातून आयोध्यासाठी आज दुपारी 4 वाजता ट्रेन निघणार आहे. या ट्रेनमधून मोठ्या प्रमाणात नागरिक जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आठ तारखेला आयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. 
  
पुष्पाचा टिजर येणार - 
आज रश्मिका मंदानाचा वाढदिवस आहे. काही दिवसापुर्वी पुष्पा च्या निर्मात्यांनी ट्विट करत कहां है पुष्पा म्हणत एक व्हीडीओ ट्विट केला होता. आणि 7 एप्रिलला 4 वाजता भेटुयात असं म्हंटलं होतं. आज पुष्पा द रूल ची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.. तसेच चित्रपटाचे टीजर येणार असल्याची चर्चा रंगलीये.
 
पुण्यातील राजकिय नेत्यांना धमक्याचे फोन, पोलिसांचा तपास सुरु, आज मोठा खुलासा होण्याची शक्यता 

पुणे – पुण्यातील राजकिय नेत्यांना सातत्याने धमक्यांचे फोन येतायत आणि खंडणीची मागणी होतेय. यामध्ये भाजपचे आमदार महेश लांडगे, कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे आणि मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांचा समावेश आहे. या तिघांनाही धमक्या देणारा व्यक्ती एकच आहे. हा धमकी देणारा तरुण पुण्यातील घोरपडी भागात रहातो आणि विवाह नोंदणी अर्थात मेट्रोमोनीयल चालवतो. या व्यतिकडे एका मुलीचे प्रोफाईल आले. ती मुलगी या व्यक्तीला आवडली आणि त्याने स्वतःच या मुलीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीने नकार दिला. त्यामुळे चिडून या व्यक्तीने त्या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. मनसेचे वसंत मोरे प्रकरणात या व्यक्तीला अटक झाली. पण जामीनावर सुटल्यावर त्याने हेच उद्योग सुरु केले आणि कॉंग्रेसचे बागवे आणि भाजपचे महेश लांडगे यांना धमक्या दिल्या. याला पुन्ह अटक करण्यात आलीय.  
 
राजस्थान – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय सेवा संगम मध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह तीन हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

पुणे – पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. 1 मे रोजी नितीन गडकरी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकल्प कसा असेल, अंडरपास कसे रंगीबेरंगी पेंटींग्जनी सजवण्यात आलेत. 
 
बारामती – संजय राऊत बारामतीमध्ये असणार आहेत. सकाळी पत्रकार परिषद घेतील. आज कर्जतला एक कार्यक्रम आहे त्यासाठी ते बारामतीतून कर्जतला जाणार आहेत.
 
केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार

सोलापूर – ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात सोलापूर जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. शेड्युल एच आणि नार्कोटिक्स संदर्भातील औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकता येत नाहीत. मात्र फ्लिपकार्ट प्लस या ऑनलाईन वेबसाईटचा वापर करून लोकल वेंडरद्वारे कोणताही प्रिस्क्रीप्शन विना ही औषधे मिळत असल्याचं जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा दावा आहे. त्यामुळे या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील संघटनेच्या वतीने केली जाते.
 
अहमदनगर – खासदार संजय राऊत आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकार मेळाव्याला उपस्थित रहाणार आहेत. या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आमदार रोहित पवार हे आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम देशमुख हे आहेत, सकाळी 10 वाजता, शारदाबाई पवार सभागृह, कर्जत.
 
जळगाव – मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना आणि विविध विकास कामांचा शुभारंभ आज धरणगाव तालुक्यातील अहिरे या गावात होणार असून यावेळी गुलाबराव पाटील यांची सभा होणार आहे.
 
धुळे – मंत्री विजयकुमार गावीत जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिरपूर येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा एकलव्य निवासी इमारत बांधकामाच्या पायाभरणी कार्यक्रम होणार आहे.
 
छ. संभाजीनगर – मंत्री गिरीश महाजन आज घाटी रुग्णालयात आरोग्य दिनानिमित्त अवयव दानासंदर्भात आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 
 
हिंगोली – उन्हाची चाहूल लागू लागली आहे. जिल्ह्यात तापमान 39 अंश सेल्सिअसच्या वर गेलाय. त्यामुळे कुलरची मागणी वाढू लागलीये. यामुळे कुलर विक्री करणाऱ्या व्यवसायिकांच्या व्यवसायाला वाढ झालीये.
 
परभणी – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा आज परभणीत असणार आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव तसेच शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे.
 
 आझाद मैदानावर आंदोलन

मुंबई – मागील जवळपास 46 दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी 149 अंतर्गत नोटीसा बजावले आहेत या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगला सागर बंगला किंवा राजभवन या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियात वायरल केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी या सर्व विद्यार्थ्यांना नोटिसा बजावले आहेत महाराष्ट्रभरातून 861 विद्यार्थी मागील 46 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत उद्या हे आंदोलन उग्र स्वरूप प्राप्त करू शकते. हे सर्व विद्यार्थी बार्टी अंतर्गत फेलोशिप प्राप्त विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची फेलोशिप बंद करण्यात आल्यामुळे हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. 
 
भिवंडी – सावरकर गौरव यात्रेत केंद्रीय मंत्री कपिल पाटील सहभागी होणार आहेत. 

हैदराबाद-लखनौमध्ये लढत -
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 7 एप्रिल रोजी दहावा सामना लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात होणार आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर (Ekana Stadium) शक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. यंदाच्या मोसमातील लखनौ संघाचा हा तिसरा सामना असेल तर हैदराबाद संघाचा दुसरा सामना असेल. दोन्ही संघ विजयाच्या आशेने मैदानावर उतरतील. 

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget