मुंबई : वंशाचा दिवा म्हणून कुटुंबात मुलगाच जन्माला यावा, ही भारतीयांची मानसिकता आता बदलत चालल्याचं आशादायी चित्र आहे. देशातील 79 टक्के महिलांना आणि 78 टक्के पुरुषांना आपल्या घरी 'कन्यारत्न' व्हावं, अशी इच्छा आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. देशातल्या 79 टक्के महिला आणि 78 टक्के पुरुषांना आपल्या कुटुंबात एक तरी मुलगी जन्मावी, असं वाटतं.15 ते 50 या सरासरी वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं.
विशेष म्हणजे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील सर्वाधिक महिला आणि पुरुषांची घरात 'धनाची पेटी' जन्मावी अशी इच्छा आहे. तसंच श्रीमंतांपेक्षा गरीब कुटुंबीयांची मानसिकता मुलींच्या जन्माबाबत जास्त सकारात्मक असल्याचं या सर्वेक्षणातून दिसून आलं.
वंशाला दिवा म्हणून एक तरी मुलगा असावा असं वाटणाऱ्या 82 टक्के महिला आणि 83 टक्के पुरुष देशातल्या वेगवेगळ्या भागात आहेत. सर्वेक्षणात सांगितली जाणारी ही आशादायी माहिती प्रत्यक्षात जनगणनेमध्ये दिसेल, तेव्हाच दिलासा मिळेल.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
79 टक्के महिलांना, 78 टक्के पुरुषांना हवं 'कन्यारत्न'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2018 11:31 AM (IST)
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -