नवी दिल्ली : येत्या अर्थसंकल्पात सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी भडका घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून एक्साईज ड्युटी कमी केली जाऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 19 रुपये 48 पैसे, तर डिझेलवर 15 रुपये 33 पैसे एक्साईज ड्युटी आकारली जाते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने दोन रुपये एक्साईज ड्युटी कमी केली होती. मात्र तरीही पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

राज्यात सर्वात महाग पेट्रोल नागपुरात

राज्याची उपराजधानी नागपुरात पेट्रोलने 80 रुपये प्रती लिटरचा टप्पा ओलांडला आहे. नागपुरातील पेट्रोलचे आजचे दर 80.73 रुपये प्रती लिटर आहेत. तर डिझेल 67 रुपये 83 पैसे प्रती लिटर आहे. दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलत असल्याने ही वाढ लक्षात येत नाही. मात्र गेल्या वर्षभरात पेट्रोलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर (प्रती लिटरमध्ये)

  • मुंबई- पेट्रोल – 80.25, डिझेल- 67.30 रुपये.

  • पुणे- पेट्रोल 80.09, डिझेल- 66.09 रुपये

  • नागपूर- पेट्रोल 80.73, डिझेल – 67.83 रुपये

  • औरंगाबाद- पेट्रोल 81.20, डिझेल 68.26 रुपये

  • सोलापूर - पेट्रोल 81.06, डिझेल 68.14 रुपये

  • नाशिक - पेट्रोल - 80.51, डिझेल - 66.55 रुपये

  • यवतमाळ - पेट्रोल -81.20, डिझेल – 67.24 रुपये

  • अहमदनगर- पेट्रोल  80.05, डिझेल - 66.11 रुपये

  • मनमाड  - पेट्रोल 80, डिझेल 65.87 रुपये

  • अमरावती  - पेट्रोल 81.19 , डिझेल 68.02 रुपये

  • अकोला - पेट्रोल - 80.23, डिझेल - 66.31 रुपये