History Of Logo : खरंतर कोणत्याही कंपनीचा लोगो (Logo) हा त्या कंपनीचा खरा चेहरा असतो. कंपनीच्या नावापेक्षा logo बघूनच त्या त्या कंपनीची खरी ओळख पटते. आज या जगात असंख्य brands चे असंख्य logo आहेत. पण, त्यातले काही प्रसिद्ध लोगोच (Famouse Logo) आपण ओळखतो. जसे की, Apple, Adidas, coke, reliance, TATA इत्यादी. पण प्रत्येक लोगोला एक अर्थ असतो. लोगोचा रंग, त्याचा आकार, त्यातील शब्द हे लोगोचा इतिहास दर्शविते. आज आपण अशाच काही intresting logo बद्दल जाणून घेणार आहोत. 


1. Hyundai : कार जगतातला हा एक विश्वासू ब्रॅंड म्हणून ओळखला जातो. बहुतके लोकांना Hyundai कंपनीचा logo ‘H’ हा त्याच्या स्पेलिंग (spelling) मधल्या पहिल्या अक्षराला अनुसरून आहे असं वाटतं. पण असे नसून या लोगोमधील दोन व्यक्ती हॅंडशेक करत असल्याचा हा सिम्बॉल आहे. हा लोगो कंपनी आणि ग्राहकांमधला व्यवहार दर्शवतो. कालांतराने या logo मध्ये बरेच बदल होत गेले.   


2. Adidas : Adidas कंपनीचा निर्माता Adolf Dassler. याच्या nik name वरुन म्हणजेच Adi Dassler वरून Adidas हे नाव कंपनीला देण्यात आलं. या कंपनीच्या सुरुवातीचा logo युरोपियन झाड असलेलं Trefoil च्या पानासारखा होता. पुढे ह्या logo च्या डिझाईनमध्ये अनेक बदल झाले. पण, त्यामध्ये असलेल्या तीन पट्ट्या ह्या कायम ठेवण्यात आल्या. आताच्या लेटेस्ट लोगो मधल्या तीन त्रिकोणी पट्ट्या म्हणजेच डोंगरासारख्या दाखवल्या आहेत. ज्याचा अर्थ struggle आणि challenges दर्शवतो.


3. Apple : Apple च्या logo ची सुद्धा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सरुवातीचा logo हा असा होता ज्यामध्ये न्यूटन झाडाखाली बसला आहे आणि झाडावर एक सफरचंद म्हणजेच Apple असं काहीसं दर्शवणारा हा logo होता. पण, कंपनीचा मालक steve jobs याला हा logo खूप complicated वाटला म्हणून त्यांनी दुसरा लोगो डिझाईन करण्यासाठी Rob Janoff यांच्या कडे दिला. Rob Janoff यांनी खूप प्रयोगानंतर logo ला uniqueness यावा आणि aaple चा logo सहज ओळखता यावा यासाठी त्यांनी apple चा लहानसा तुकडा खाऊन cut असलेला apple चा logo तयार केला. योगायोगाने तो apple चा byte हा computer language मधल्या Appl bite असा झाला आणि हा कट असलेला लोगो वापरात आला. पुढे हा logo वेगवेगळ्या रंगांमध्ये डिझाईन करण्यात आला.


4. Baskin Robbins : हा लोगो सुद्धा फार अर्थपूर्ण आहे. या logo मधला गुलाबी भाग आहे तो 31 अंक दर्शवतो. ज्याचा अर्थ या कंपनीकडे आईस्क्रीमचे 31 flavour आहेत असा आहे.


5. Toyota : बहुतके लोक toyota चा logo बघून कल्पना करतात की तो एक टोपी (Hat) घातलेला cowboy चा symbol असावा पण तसं नाही. तर हा logo सुई दोऱ्याच्या प्रेरणेने बनवला आहे. जो company चा इतिहास दर्शवतो. 1920-1930 च्या दरम्यान ही कंपनी शिलाई मशीन बनविण्यात प्रसिद्ध होती. त्याचंच प्रतीक म्हणनू हा लोगो तयार करण्यात आला आहे. या लोगोला व्यवस्थित पाहिलं तर यात कंपनीचं पूर्ण नाव आहे. TOYOTA


6. Audi : कारच्या जगतातलं आणखी एक महत्वाचं नाव म्हणजे audi. बऱ्याच लोकांची ही ड्रीम कार आहे. तिचा स्पीड, तिचं डिझाईन आणि luxuriousness साठी ती ओळखली जाते. या कारचा लोगोही फार सरळ आणि सुंदर आहे. यात असलेल्या चार रिंग्स हे आपल्याला कार्सचेच टायर आहेत असं वाटतं पण तसं अजिबात नाहीये. सर्वात आधी audi हे नाव कंपनीचे निर्माता August Horch यांच्या Horch या नावावरून पडलं. Horch चा अर्थ ऐकणे असा होतो, त्याला लॅटिन भाषेत Audi असं म्हणतात. सुरुवातीला Audi चा लोगो हा असा काहीसा होता. पुढे या ऑडीने तीन कंपन्यांसोबत भागीदारी केली.  Horch - DKW आणि wonder आणि या तीन कंपन्यांची युनिटी दर्शवणारा हा लोगो तयार करण्यात आला.


7. Sony Vaio : म्हणजेच Visual Audio Intelligent Organiser हा एक स्मार्ट आणि थोडा टेक्निकल लोगो आहे. VAIO चे पहिले दोन अक्षर हे Analogue wave म्हणजेच तरंग दर्शवतात. आणि शवेटचे दोन अक्षर 1 आणि 0.  हे binary code मध्ये digital signal दर्शवतात. 


8. Amazon : सुरुवातीला amazon चा लोगो खपू simple होता. कालांतराने त्यात खपू बदल होत गेले. त्यानंतर 2000 साली कंपनीने नवीन लोगो लॉन्च केला. त्यात एक arrow add केला जो A आणि Z ला Target करतो. याचा अर्थ amazon ग्राहकांच्या A to Z गरजा पूर्ण करते असा होतो. त्याचबरोबर smile shape मध्ये असलेला हा arrow ग्राहकांना समाधान आणि मैत्रीपूर्ण नातं असल्याचं दर्शवतो. विश्वास दाखवतो.  


9. Olympic : ऑलिम्पिक. ह्या खेळाची संकल्पना इ.स.पूर्व 8 व्या शतकात ग्रीसमधल्या ऑलिंपिया या स्पर्धेची आहे. त्या काळी ग्रीसमधले अनेक राज्य यात सहभाग घेत असत. पांढऱ्या मैदानावर रंगीत निळ्या, पिवळ्या, काळा, हिरवा आणि लाल अशा पाच इंटरलॉकिंग रिंग्स आहेत, ज्याला "ऑलिम्पिक रिंग्स" म्हणनू ओळखलं जातं. हे चिन्ह मुळात 1913 मध्ये कुर्बटीन या डिझायनरने तयार केले होते. युरोप, आशिया, आफ्रिका, ओश्निया या आणि अमेरिका या पाच लोकवस्ती असलेल्या खंडांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी या रिंग्स तयार करण्यात आल्या आहेत. 


10. Gillette : जिलेट ही एक रेझर कंपनी आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, या logo चा font जरी simple असला तरी बारकाईने पाहिल्यानंतर हा त्या कंपनीचे उत्पादन वैशिष्ट्य दाखवतो. या मध्ये G आणि I चा लहानसा तुकडा sharply cut करण्यात आला आहे. जो razor चा धारदार पणा किंवा टोकदारपणा दर्शवतो.