जम्मू-काश्मीरमध्ये सध्या अमरनाथ यात्रा सुरु असून या यात्रेसाठी देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल होतात. या यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव दल अर्थात सीआरपीएफकडे असते. मात्र यावर्षी दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडे यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती
रात्री साडेआठच्या दरम्यान बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या बसमध्ये जवळजवळ 60 ते 70 भाविक असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले आहेत.
दरम्यान, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा कसून शोध सुरु आहे.