एक्स्प्लोर

रमजान महिन्यातील शस्त्रसंधीत 68 दहशतवादी हल्ले

रमजानच्या काळात दहशतवाद्यांकडून 68 हल्ले करण्यात आले, तर भारतीय सुरक्षा बलाकडून सहा ऑपरेशन राबवण्यात आले.

नवी दिल्ली : रमजान महिन्याच्या काळात लागू केलेल्या शस्त्रसंधीत 68 दहशतवादी हल्ले झाले. शस्त्रसंधी लागू करण्यापूर्वीच दोन दहशतवादी घटना घडल्या होत्या. तरीही भारताने धार्मिक भावनांचा आदर करत शस्त्रसंधी लागू केली. मात्र दहशतवाद्यांनी या काळातही घुसखोरी चालूच ठेवली. केंद्र सरकारकडून ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’ या मिशनअंतर्गत 17 मे 2018 ला शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात चालू असलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’ला स्थगिती देण्यात आली होती. रमजानच्या काळात दहशतवाद्यांकडून 68 हल्ले करण्यात आले, तर भारतीय सुरक्षा बलाकडून सहा ऑपरेशन राबवण्यात आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये 28 ग्रेनेड हल्ले आणि अकस्मात गोळीबारीच्या 24 घटना घडल्या. तर दहशतवाद्यांनी आठ सर्वसामान्यांवर हल्ला केला, नऊ लुटमारीच्या घटना घडल्या. याशिवाय भारतीय जवानांवर दगडफेकही अनेकदा करण्यात आली. एकूणच शस्त्रसंधीचा भारताचा अनुभव काही फारसा चांगला राहिलेला नाही. अधिकृत आकडेवारी नुसार वर्षभरात पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्याचं दिसून येतं. 2018 मध्ये पहिल्या पाच महिन्यात म्हणजेच जानेवारी ते मे दरम्यान पाकिस्तानकडून 1252 वेळा शस्त्रसंधी असूनही गोळीबार करण्यात आला. जम्मू-काश्मीर सीमारेषेवर तर पाकिस्तानने तब्बल 300 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. रमजानमध्ये लागू केलेली शस्त्रसंधी मागे रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्रीय गृह मंत्रालयाने मागे घेतली आहे. शस्त्रसंधी लागू असली तरी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर लष्कराकडून लगेच चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा  दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरु करण्यात येणार आहे. ''रमजानदरम्यान घेण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या निर्णयाची चहूबाजूंनी प्रशंसा करण्यात आली होती. आता दहशतवाद्यांना रोखण्यासाठी लष्कराने कठोर कारवाई करावी,'' असं गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Abhijeet Dipke: आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? तूच निर्णय घे, दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेला प्रस्ताव
आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? तूच निर्णय घे, दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेला प्रस्ताव

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
Embed widget