एक्स्प्लोर

आजपासून बचत खात्यातून 50 हजार रुपये काढता येणार!

मुंबई : आजपासून बँक खातेधारकांना आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढणार आहे. आजपासून आठवड्याला पन्नास हजारांची रक्कम काढता येणार आहे. यापूर्वी पैसे काढण्यावरील मर्यादा 24 हजारांची होती. आता ही मर्यादा पन्नास हजार करण्यात आली आहे. तसंच 13 मार्चपासून खात्यावरुन पैसे काढण्यासाठी कोणतेही बंधन नसेल. नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली बंधनं अद्यापही कायम आहेत. निश्चलनीकरणाची प्रक्रिया संपत आली असून लवकरच आर्थिक व्यवहारांवरचे निर्बंध पूर्णपणे शिथील केले जातील, अशी माहिती अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी 3 फेब्रुवारीला दिली होती. 8 नोव्हेंबरनंतर आर्थिक व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध जवळपास शिथिल करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. बँकेतील बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार किंवा महिन्याला 96 हजार रूपये रक्कम खूपच कमी असल्यानं रिझर्व्ह बँक लवकरच हे निर्बंध उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान 13 मार्चपासून बचत खात्यातून पैसे काढण्यावरील सर्व बंधनं मागे घेण्यात येतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधीच यासंदर्भात घोषणा केली आहे. बचत खात्यातून आठवड्याला काढता येणाऱ्या रकमेची मर्यादा आजपासून 50 हजार होणार आहे. 27 जानेवारीला 9.92 लाख कोटी रुपये चलनात असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. यापूर्वी एक फेब्रुवारीपासून बचत खात्यातून प्रत्येक दिवशी 24 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. आठवड्याला मात्र खात्यातून 24 हजार रुपयेच काढता येणार होते. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना दिलासा देत आरबीआयने चालू खात्यावरील सर्व निर्बंध मागे घेतल्याची घोषणा केली होती. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनातील तत्कालीन नोटा बाद केल्या. नागरिकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकेत परत करण्यास किंवा बदलण्यास 30 डिसेंबर 2016 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे एटीएम आणि बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर एटीएम आणि बँकाबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. संबंधित बातम्या : एटीएममधून दरदिवशी पैसे काढण्याची मर्यादा 24 हजारांवर एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा फेब्रुवारी अखेर शिथील? 500-1000 च्या जुन्या नोटाबदलीसाठी RBI कडून ‘सेकंड चान्स’ ?

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Protest : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक, दिल्ली दणाणली
बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक, दिल्ली दणाणली
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: गुप्तांग कापलं, चुरा करुन ठेवलं, धोतरावर रक्तांचे डाग; रसिक दुलारींच्या कुटुंबीयांचा हादरवणारा दावा, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
गुप्तांग कापलं, चुरा करुन ठेवलं; रसिक दुलारींच्या कुटुंबीयांचा हादरवणारा दावा, प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?

व्हिडीओ

Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Embed widget