19 October In History : मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुरुवातीच्या काळात मराठा साम्राज्याची पडझड व्हायला सुरूवात झाली. त्यावेळी औरंगजेबाने रायगड किल्ला ताब्यात घेतला. तर आजच्याच दिवशी ब्रिटिशांच्या सैन्याने अमेरिकन जनरल जॉर्ज वाशिग्टनच्या (George Washington) सैन्यासमोर शरणागती पत्करली. यासह इतर महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,


1689 : औरंगजेबाने रायगड किल्ला ताब्यात घेतला


मराठा साम्राज्याच्या मानबिंदू असलेला रायगड किल्ला (Raigad Fort) 19 ऑक्टोबर 1689 रोजी औरंगजेबने (Aurangzeb) ताब्यात घेतला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने मराठा साम्राज्य जिंकण्यासाठी पावले उचलली आणि त्यासाठी राजधानी रायगड ताब्यात घेतली. 


सन 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chh. Shivaji Maharaj) जावळीच्या मोऱ्यांकडून रायरी हा किल्ली जिंकून घेतला होता. त्यानंतर त्याचा विस्तार करत त्याला रायगड असं नाव दिलं. रायगड म्हणजे एक अभेद्य किल्ला... आजूबाजूला घनदाट जंगल आणि भक्कम तटबंदी असा हा रायगड. त्यामुळे शिवरायांनी त्याला राजधानी बनवली. 


छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने हा किल्ला ताब्यात घेतला. औरंगजेबचा सरदार झुल्फिखार खानने या किल्ल्याचं नाव इस्लामगड असं केलं. नंतरच्या काळात मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतला. 1818 साली जेव्हा ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. ब्रिटिशांनी मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिक नष्ट करण्यासाठी तोफेच्या सहाय्याने हा किल्ला उद्ध्वस्त केला. 


1774 :  ईस्ट इंडियाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिशांची कौन्सिल भारतात


सन 1773 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनी (East India Company) मोठ्या आर्थिक तणावाखाली होती. ईस्ट इंडिया कंपनी अडचणीत सापडणे ही ब्रिटिशांसाठी चिंतेची गोष्ट होती. त्यामुळे ईस्ट इंडियाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिशांची एक कौन्सिल भारतात आली. 


1781 : ब्रिटिशांची अमेरिकेसमोर शरणागती 


19 ऑक्टोबर 1781 साली ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली. ब्रिटनचा सेनानी लॉर्ड कॉर्नवॉलिसने यॉर्कटाउन व्हर्जिनिया येथे अमेरिकन जनरल जॉर्ज वॉशिंग्टनसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे अमेरिकन क्रांती संपली आणि देश स्वातंत्र झाला. त्यानंतर जॉर्ज वॉशिग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. 


1812 : नेपोलियन बोनापार्टच्या सैन्याने रशियातून माघार घेतली


महान सेनानी अशी ओळख असलेल्या नेपोलियन बोनापार्टच्या फ्रेंच सैन्याने रशियामधून माघार घ्यायला सुरूवात केली. 


1933 : बास्केटबॉलचा ऑलिम्पिक खेळांमध्ये समावेश 


बर्लिन ऑलिम्पिक खेळांच्या आयोजन समितीने 19 ऑक्टोबर 1933 रोजी पहिल्यांदा बास्केटबॉलचा ऑलिम्पिक खेळांमध्ये समावेश करण्याची घोषणा केली. बास्केटबॉलची सुरुवात कॅनडामध्ये 1891 मध्ये झाली आणि 1933 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये बास्केटबॉलचा समावेश करण्यात आला. तर महिलांच्या बास्केटबॉलची सुरुवात 1976 च्या ऑलिम्पिकपासून झाली. 


1983 :  एस चंद्रशेखर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक


सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर हे एक भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ होते. आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मुलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते. ताऱ्यांची उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखर यांनी शोधून काढले. या कामासाठी त्यांना 1983 चे नोबेल पारितोषिक मिळाले. शिवाय त्यांना पद्मविभूषण, ब्रूस पदक आणि इतर अनेक पारितोषिके मिळाली आहेत. 


1993 : बेनझीर भुट्टो दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी


बेनझीर भुट्टो (Benazir Bhutto) या मुस्लिम देशाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बेनझीर भुट्टो दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या.19 ऑक्टोबर 1993 रोजी बेनझीर बुट्टो यांनी दुसऱ्यांना पाकिस्तानच्या पंतप्रदानपदाची सूत्रे हाती घेतली होती.  27 डिसेंबर 2007 रोजी त्यांची हत्या झाली. 


 2003 : मदर टेरेसा यांना संत म्हणून घोषित केले


पोप जॉन पॉल द्वितीय यांनी मदर टेरेसा (Mother Teresa)  यांना संत म्हणून घोषित केले. जेमदर टेरेसा यांना 1979 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आणि 2016 मध्ये त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. 


 2005 : मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेनविरुद्ध खटला 


इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांनी आपल्या दोन्ही जावयांची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. ते दोन वेळा इराकचे राष्ट्राध्यक्ष राहिले होत. 30 डिसेंबर 2006 रोजी उत्तर बगदाद येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता त्यांना फाशी देण्यात आली. सद्दाम हुसेन यांचा जन्म 28 एप्रिल 1937 रोजी बगदादमधील अल-ओजा गावात झाला. त्यांना लहानपणापासूनच निर्दयी बनवले. मुलांकडून मारहाण होईल या भीतीने लहाणपणी सद्दाम नेहमी आपल्याजवळ लोखंडी रॉड ठेवत असे. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 66 इराकी नागरिकांना ठार केले. 1982 मध्ये त्यांच्यावर एकदा हल्ला झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून तेथे त्यांनी 148 शिया लोकांना मारले. हाच निर्णय  त्यांच्या फाशीचे कारण ठरला आणि 2006 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.  


ही बातमी वाचा: