एक्स्प्लोर

LIVE : अखिलेश आणि रामपाल यादवांचं निलंबन रद्द

लखनऊ : उत्तर प्रदेशातील यादव कुटुंबातील यादवीत अखिलेश यादव यांची सरशी झाली आहे. कारण अवघ्या 12 तासात अखिलेश आणि रामगोपाल यांचं निलंबन मुलायम यांनी मागे घेतलं आहे. इतकंच नव्हे तर शिवपाल आणि अखिलेश या दोघांनीही जाहीर केलेल्या उमेदवारांच्या याद्याही रद्द करण्यात आल्या आहेत.  त्यामुळं आता नव्यानं मुलायम, अखिलेश आणि शिवपाल उमेदवारांची निवड करणार आहेत. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुलायम सिंह यादव यांचं कुटुंब विखुरलं होतं. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि चुलत भाऊ रामगोपाल यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं होतं. आता ते मागे घेण्यात आलं आहे. अबू आझमी, आझम खान यांच्यासह अखिलेश यादव मुलायम सिंह यांच्या घरी पोहोचले होते. इथे त्यांची बैठक झाली. यावेळी अखिलेश यादव यांनी 207 आमदारांची यादी मुलायम सिंह यांना सोपवली. समर्थकांची बैठक अखिलेश यादव आणि मुलायम सिंह यादव या आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली होती. पण मुख्यमंत्री अखिलेश यादव मुलायम यांच्यावर भारी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण अखिलेश यांच्या बैठकीत 198 आमदार आणि 25 मंत्री उपस्थित होते. तर मुलायम यांच्या बैठकीत आतापर्यंत केवळ 11 आमदार आणि 67 उमेदवार दाखल झाले. दरम्यान, या बैठकीत अखिलेश यादव यांना अश्रू अनावर झाले. "मी वडिलांपासून वेगळा झालेलो नाही. उत्तर प्रदेश विधानसभा जिंकून त्यांना भेट देणार," असं अखिलेश म्हणाले.
मुख्यमंत्री अखिलेश यादवांची समाजवादी पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी
नेमका वाद काय? निवडणुकांच्या तोंडावर जो कोणी पक्षात येईल, त्याला प्रवेश द्यायचा हा शिवपाल यादव यांचा निर्णय. मात्र त्याला मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यांचा विरोध होता. त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे. त्यानंतर शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली. हा सर्व वाद दीड महिन्यापूर्वीचा होता. त्यानंतर स्वत: नेताजींनी म्हणजेच मुलायम सिंहांनी हा वाद मिटवला होता. शिवपाल परत मंत्रिमंडळात आले होते.

सपामध्ये उभी फूट, अखिलेश यादवांकडून 235 उमेदवारांची यादी जाहीर

पुन्हा वाद उफाळला शिवपाल यादव हे मुलायमसिंहांचे लहान बंधू. तेच त्यांच्या जास्त जवळचे आहेत. त्यामुळेच शिवपाल यांनी मंत्रिमंडळात परतल्यानंतर अखिलेश समर्थकांवर धडाधड वार करण्यास सुरुवात केली. अखेरीस या सगळ्याचा स्फोट झाला. अखिलेशनं दीड महिन्याच्या काळात पुन्हा एकदा आपल्या काकाला हिसका दाखवला. थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन. म्हणजे ज्या शिवपाल यांच्याकडे सिंचन, पीडब्लूडी, महसूल यासह सहा महत्वाची खाती होती ते एका झटक्यात मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेत. अर्थात या चालीला उत्तर द्यायला मुलायम यांना दोन तासही लागले नाहीत. त्यांनी तातडीनं अखिलेशचे गुरु मानले जाणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं. वर त्यांच्यावर भाजपशी साटंलोटं करुन पक्षाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही केला. कोण कुणाच्या बाजूने?
मुलायम सिंह अखिलेश यादव
शिवपाल यादव (सख्खाभाऊ) पत्नी डिंपल यादव
मुलायम सिंहांची पत्नी साधना रामगोपाल यादव (मुलायम सिंहांचे चुलतभाऊ)
मुलगा प्रतिक यादव अक्षय यादव (रामगोपाल यांचे पुत्र)
शिवपाल यांचा मुलगा आदित्य
 
महत्त्वाच्या बातम्या

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
ज्ञानेश कुमारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका, विरोधातील सर्व याचिका मंजूर, 27 ऑक्टोबरला होणार एकत्रित सुनावणी
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
Embed widget