एक्स्प्लोर

दिल्लीत महाराष्ट्रातील 16 खासदारांवर अचानक बेघर होण्याची वेळ

महाराष्ट्रातल्या 16 खासदारांना दिल्लीत अचानक बेघर होण्याची वेळ आहे. कारण या सर्वांना महाराष्ट्र सदन सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 16 खासदारांवर दिल्लीत अचानक बेघर होण्याची वेळ आली आहे. शासकीय निवासस्थान न मिळाल्याने हे 16 खासदार महाराष्ट्र सदनात राहत आहेत. 28 जानेवारीला लोकसभा सचिवालयाकडून अचानक पत्र आलं आणि महाराष्ट्र सदन पुढच्या दोन दिवसांमध्ये सोडा, अशा सूचना या खासदारांना करण्यात आल्या आहेत.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपच्या खासदार भारती पवार, भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर, एमआयएम खासदार इम्तियाज जलील, शिवसेना खासदार हेमंत पाटील, भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी, ओमराजे निंबाळकर, रणजीत नाईक निंबाळकर यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र सदन न सोडल्यास तुमच्या खात्यातून रक्कम वसूल करु अशीही तंबी या खासदारांना देण्यात आली आहे. या सर्व खासदारांना वेस्टर्न कोर्टमध्ये जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या वेस्टर्न कोर्टमध्ये खासदारांची सोय करण्यात आली आहे तिथे बऱ्याच सोयी-सुविधा नसल्याने खासदारांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत शासकीय निवासस्थान मिळत नाही तोपर्यंत खासदारांच्या राहण्याचा खर्च लोकसभा सचिवालयाकडून होत असतो. महाराष्ट्र सदनाचे सहा हजार रुपये दिवसाचे भाडे सचिवालय भरत होतं. पर्यायानं हे राज्य सरकारला मिळत होतं.

मात्र अचानक केंद्राच्या गेस्ट हाऊसमध्ये शिफ्ट होण्याचे आदेश या खासदारांना देण्यात आले आहेत. या निर्णयाने अनेक खासदारांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. अनेकांनी आपली नाराजी आदित्य ठाकरे यांच्याकडे बोलून दाखवली. अधिवेशन सुरू असतानाच असा आदेश आल्याने अनेकांची पळापळ झाली आहे. त्यानंतर सर्वपक्षीय खासदार आणि महाराष्ट्र सदनचे आयुक्त यांच्यात आता दुपारी बैठक होणार आहे.

मी स्वत: सर्व खासदारांना जाऊन भेटणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, अशी त्यांना विनंती करणार आहे. लोकसभा सचिवालयातही जाऊन याविषयी चर्चा करणार आहे. तसेच त्यांना झालेल्या त्रासाबद्दल खेदही व्यक्त करतो. मात्र खासदारांना याठिकाणाहून हलवण्याचं कारण अद्याप मला माहित नाही, असं महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त समीर सहाय्य यांनी सांगितलं.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, भाजपच्या खासदार भारती पवार, भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर, एमआयएम खासदार इम्तियाज जलील, शिवसेना खासदार हेमंत पाटील, भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी,  ओम राजे निंबाळकर, रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
Exam Reforms Task Force : पेपरफुटी रोखण्यासाठी आता 'आधार' कार्डचे जनक मैदानात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, हाय-पावर टास्क फोर्सची स्थापना
पेपरफुटी रोखण्यासाठी आता 'आधार' कार्डचे जनक मैदानात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, हाय-पावर टास्क फोर्सची स्थापना
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget