Vaibhav Naik Meets Ravindra Chavan : उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यानंतर येथील राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे)  कट्टर समर्थक आमदार वैभव नाईक यांनी भाजप नेते तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांची आज गुप्त भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शिवसेना नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांतच ठाकरे यांच्या व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी आमच्याकडे येतील, असं मोठे विधान केलं होतं. त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.


वैभव नाईक आणि रवींद्र चव्हाण या उभयतांमधील भेटीमुळे कोकणच्या राजकारणात उलट सुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाल्यानं सिंधुदुर्गात मोठी खळबळ उडाली आहे. उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक गुपचूप भेट घेतली. या भेटीच्या वृत्ताने सर्वांच्या भुवया उंचावल्या. वैभव नाईक हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अधूनमधून बातम्या येत असतात. मात्र आज अचानक वैभव नाईक यांनी भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्यानं सर्वांनाच धक्का दिला. याबाबत वैभव नाईक यांनी भेट घेतल्याचे एबीपी माझाला सांगितलं. रवींद्र चव्हाण यांनीही याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. 


शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घेतली मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट झाली. नाईक व चव्हाण बंद दाराआड भेटीनंतर चर्चांना उधाण आले होते. यावर मंत्री चव्हाण यांकडून वैभव नाईक यांच्या भेटीवर स्पष्टीकरण दिलं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय नाही, असे चव्हाण यांनी सांगितलं. 


वैभव नाईक यांच्याशी भेट झाल्यानंतर रवींद्र चव्हाण काय म्हणाले ?


सिंधुदुर्गमध्ये आज जिल्हा नियोजन समितीचा सर्व कामाच्या आढावा संदर्भातील एक बैठक घेण्यासाठी मी आलो होतो.  कोकणकन्या रेल्वे उशीरा आल्यामुळे कणकवली येथील गेस्टहाऊसमध्ये आरामास थांबलो होतो. त्यावेळी सर्व कार्यकर्तेही आले होते. पण अचानक वैभव नाईक अचानक आले. त्यांची आणि माझी भेट झाली. वर्तमानपत्र आणि न्यूजवर अनेक उलटसुटल बातम्या सुरु आहे. भाजप आणि संघटनात्मक वाढीसाठी मी नेहमीच प्रयत्न करत असतो. अनेक लोकप्रतिनिधी माझ्या संपर्कात असतात. या संदर्भात वैभव नाईक यांनी याबाबत अनेकदा माझ्याशी चर्चा केली. कोकण या विषयावर नारायण राणेंना विचारल्याशिवाय यासंदर्भातील कोणताही निर्णय मी करु शकणार नाही. त्याशिवाय इतर चर्चाही झाल्या. बंद दाराआढ काय झालं, हे जर सांगितलं नाही तर उचीत ठरणार नाही, त्यामुळे मी हे स्पष्ट करतोय. नारायण राणे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असतो. कोणत्याही नेत्याला भाजपला यायचं असेल तर चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय काही करत नसतो, असं सर्वांना सांगत असतो, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.