एक्स्प्लोर

नोटाबंदीच्या 15 महिन्यानंतरही जुन्या नोटांची मोजणी अद्याप अपूर्ण

नोटाबंदीला 15 महिने झाले आहेत, पण अद्याप 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटांची मोजणी पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिलं आहे. पीटीआय या वृत्त संस्थेने माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीला उत्तर देताना रिझर्व बँकेकडून ही माहिती दिली.

  नवी दिल्ली : नोटाबंदीला 15 महिने झाले आहेत, पण अद्याप 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटांची मोजणी पूर्ण झालेली नसल्याचे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीला उत्तर देताना रिझर्व बँकेने ही माहिती दिली. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, “500 आणि 1000 रुपयाच्या नोटांची नेमकी आणि प्रमाणित माहिती तपासण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल. त्यानंतरच नोटाबंदीनंतर किती नोटा परत आल्या याची नेमकी आणि विश्वासार्ह माहिती देता येईल.” तसेच, या व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, अंदाजित आकड्यात तफावत राहू शकते, असंही बँकेनं म्हटलं आहे. 30 जून 2017 पर्यंत जमा झालेल्या नोटांची संख्या 15.28 लाख कोटी रुपये होती. त्यामुळे त्याच्या मोजणीची प्रक्रिया वेगाने सुरु असल्याचंही बँकेने स्पष्ट केलं. सध्या रिझर्व बँकेकडून जुन्या नोटांची मोजणी करण्यासाठी 59 करन्सी व्हेरिफिकेशन अँड प्रोसेसिंग मशीन (CVPS) चा वापर करण्यात येत आहे. यात कमर्शियल बँकांजवळील आठ मशिन, तर सात मशिन हे भाडेतत्वावर घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. पण या सर्व मशिन कुठे कुठे कार्यरत आहेत, याची माहिती रिझर्व बँकेने दिलेली नाही. दरम्यान, गेल्या वर्षी 30 ऑगस्ट रोजी रिझर्व बँकेने आपला वार्षिक अहवाल सादर केला. या अहवालात नोटाबंदीनंतर आत्तापर्यंत 15.28 लाख कोटी बँकेकडे परत आल्याचं सांगण्यात आलं होतं. तसेच ही रक्कम एकूण रकमेच्या 99 टक्के म्हणजे, 16 हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत होतं.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा, 24 तासात राहुल गांधींना पोलिसांनी दोनदा घेतलं ताब्यात, खर्गे म्हणाले, आम्ही घाबरणार नाही
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
CJP Protest : राहुल गांधींच्या आंदोलनानंतर CJP च्या अभिजीत दिपकेंचा धमाका, दिल्लीत मोठं आंदोलन; बॅरिकेडट तोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तयार
राहुल गांधींच्या आंदोलनानंतर CJP च्या अभिजीत दिपकेंचा धमाका, दिल्लीत मोठं आंदोलन; बॅरिकेडट तोडण्यासाठी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तयार
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget