On This Day In History : 14 डिसेंबर या दिवशी इतिहासात अनेक घडोमोडी घडल्या आहेत. या दिवशी मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. ध्रुवीय अन्वेषण क्षेत्रातील रोआल्ड अमुंडसेन यांनी 14 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले.  अ‍ॅमंडसेन यांनी जून 1910 मध्ये अंटार्क्टिकाला रवाना झाले आणि दीड वर्षांच्या प्रवासानंतर त्यांनी दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. आजच्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर 1924 रोजी अभिनेते राज कपूर (Raj Kapoor) यांचा जन्म झाला. याबरोबरच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पूत्र संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचा 14 डिसेंबर 1946 रोजी जन्म झाला. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. 


1903 : किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला पहिला प्रयत्न केला. 


विमानाचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक राईट बंधू  त्यांनी  14 डिसेंबर 1903 रोजी हवेपेक्षा जड अशा विमानाची पहिली यशस्वी चाचणी घेतली. अनेक अडचणींचा सामना करून 1905 मध्ये पहिले विमान तयार केले. 


1911 : मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले
या दिवशी मानवाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. ध्रुवीय अन्वेषण क्षेत्रातील रोआल्ड अमुंडसेन यांनी 14 डिसेंबर 1911 रोजी प्रथमच दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले.  अ‍ॅमंडसेन यांनी जून 1910 मध्ये अंटार्क्टिकाला रवाना झाले आणि दीड वर्षांच्या प्रवासानंतर त्यांनी दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवले. 


1918 : पहिले योगगुरू बीके. एस अय्यंगार यांचा जन्म 


कर्नाटकातील बेल्लूर येथे जन्मलेल्या बीके. एस अय्यंगार यांना देशातील पहिले योगगुरू होण्याचा मान मिळाला आहे. त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1918 रोजी झाला. बीकेएस अय्यंगार वयाच्या 90 व्या वर्षीही योगासाठी वेळ काढत असत. ते दिवसातून तीन तास आसने आणि दर तासाला प्राणायाम करत असत. 200 हून अधिक शास्त्रीय योगासने आणि 14 प्रकारचे प्राणायाम करत असत. अय्यंगार यांचे वयाच्या 96 व्या वर्षी किडनीच्या दीर्घ आजाराने पुण्यात निधन झाले.


1924 : अभिनेते राज कपूर यांचा जन्म 


 हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 रोजी झाला. 1930 च्या दशकात बॉम्बे टॉकीजमध्ये क्लॅप बॉय बनलेल्या राज कपूर यांनी पृथ्वी थिएटरमधून वयाच्या दहाव्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अभिनयाव्यतिरिक्त चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनातही त्यांनी नाव कमावले. मेरा नाम जोकर, संगम, अनाड़ी, जिस देश में गंगा बहती है या सारखे अनेक चित्रपट त्यांनी दिले, बॉबी, राम तेरी गंगा मैली, प्रेम रोग सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.  1971 मध्ये पद्मभूषण आणि 1987 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 
 
1946 : संजय गांधी यांचा जन्म


माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पूत्र संजय गांधी यांचा 14 डिसेंबर 1946 रोजी जन्म झाला. मनेका गांधी त्यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. वरुण गांधी हे त्यांचे पूत्र आहेत. गोरखपूरच्या वीर बहादूर सिंह यांना रस्त्यावरून उचलून त्यांनी यूपीचे मुख्यमंत्री केले. लहान वयातच एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 


1972 :  अपोलो 17 हे परत आले


अमेरिकेने चंद्रावर पाठवलेले मानवयुक्त अंतराळ यान अपोलो 17 हे परत आले. या दिवशी अमेरिकेचे चंद्रवरील  शोध कार्य थांबवले.  


1977 : गीतकार, कवी, लेखक ग. दि. माडगूळकर यांचे निधन


कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध स्वरूपात ग. दि. माडगूळकर यांची ओळख मराठी साहित्य क्षेत्रात आहे. घरातील परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात चरितार्थासाठी चित्रपटांच्या कथा – संवाद – गीतलेखनाचे काम केले. त्यातही त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. 14 डिसेंबर 1977 रोजी त्यांचे निधन झाले. 


1995 : डेटन करारावर स्वाक्षरी


बोस्निया, सर्बिया आणि क्रोएशिया यांनी पॅरिसमधील डेटन करारावर स्वाक्षरी केली आणि त्यांच्यातील तीन वर्षांचा संघर्ष संपवला.


2012 : अमेरिकेच्या कनेक्टिकटच्या न्यूटाऊनमध्ये हल्ला, 28 जणांचा मृत्यू


अमेरिकेत, कनेक्टिकटच्या न्यूटाऊनमध्ये झालेल्या गोळीबारात 28 जणांचा मृत्यू झाला.  


2013 : भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन 


भारतीय चित्रकार सी. एन. करुणाकरन यांचे 14 डिसेंबर 2013 रोजी निधन झाले.