एक्स्प्लोर
LIVE : पाटणा-इंदूर एक्स्प्रेस दुर्घटनेत 100 हून जास्त प्रवाशांचा मृत्यू
कानपूर : इंदूरहून पाटण्याच्या दिशेने जाणाऱ्या पाटणा-इंदूर राजेंद्रनगर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले आहेत. या दुर्घटनेत अनेक प्रवाशांना प्राण गमवावे लागले असून 200 हून अधिक जण गंभीर जखमी आहेत.
UPDATE : पाटणा-इंदूर एक्स्प्रेस अपघातातील मृतांचा आकडा शंभर वर, आणखी काही जण अडकल्याची भीती
UPDATE : पाटणा-इंदूर एक्स्प्रेस अपघातात 96 प्रवाशांचा मृत्यू
https://twitter.com/ANINewsUP/status/800191178666672128
https://twitter.com/ANINewsUP/status/800180049873813504
UPDATE : पाटणा-इंदूर एक्स्प्रेस अपघातात 63 प्रवाशांचा मृत्यू
रविवारी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास कानपूरमधल्या पुखरायन भागात एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले. रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे गाडी घसरल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. माल डब्ब्यासह GS,GS,A1,B1/2/3,BE,S1/2/3/4/5/6 हे डबे घसरले.
https://twitter.com/ANINewsUP/status/800168099685089280
UPDATE : एक्स्प्रेसचे डबे घसरुन झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा 55 वर
अपघाताची माहिती मिळताच मेडिकल टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातानंतर त्या मार्गावरील इतर ट्रेनचा मार्ग वळवण्यात आले आहेत.
https://twitter.com/ANINewsUP/status/800177906475356160
UPDATE : 14 डबे घसरुन 45 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव जातीने या दुर्घटनेची माहिती घेत असून केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मदतीचे आदेश दिले आहेत.
रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रेल्वेमंत्र्यांनी साडेतीन लाखांची मदत घोषित केली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पाच लाखांची तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींना रेल्वेमंत्री, पंतप्रधान, मध्यप्रदेश सरकारने प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.
https://twitter.com/ANINewsUP/status/800154378711678976
https://twitter.com/sureshpprabhu/status/800155565829681152
https://twitter.com/sureshpprabhu/status/800155802321334272
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement