On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आज म्हणजे 9 डिसेंबर रोजी पोर्तुगीजांच्या ताब्यातील दीव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट झालं होतं. आज जागतिक व्हायोलिन दिवस (national violin day) आहे. आजच्याच दिवशी संसदभवनावर झालेल्या हल्ल्याला आज 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. 13 डिसेंबर 2001 हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या या स्मिता पाटीलचा आज स्मृतिदिन. तर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची आज जयंती. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
जागतिक व्हायोलिन दिवस (national violin day)
फिडल म्हणून ओळखल्या जाणार्या वाद्याचा सन्मान करून 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय व्हायोलिन दिवस जगभरात साजरा केला जातो. व्हायोलिनच्या वादनादरम्यान वादक अनेक प्रकारे आवाज काढतो. व्हायोलिन वादक व्हायोलिनमध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी अनेक तंत्र वापरतो. आपण व्हायोलिनला शास्त्रीय संगीताशी जोडतो. संगीत क्षेत्रात महत्वाचं वाद्य असलेल्या व्हायोलिनचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
1989 : आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे अपहरण दहशतवाद्यांनी केलं होतं. त्याबदल्यात दहशतवाद्यांनी 5 दहशतवाद्यांना सोडण्याची अट घातली होती. पाच दहशतवाद्यांना सोडल्यानंतर त्यांच्या मुलीची सुटका झाली होती.
2001: काळा दिवस, संसदभवनावर झाला होता हल्ला
आजच्याच दिवशी संसदभवनावर झालेल्या हल्ल्याला आज 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. 13 डिसेंबर 2001 हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस आहे. या दिवशी भारतीय लोकशाहीवर सर्वांत मोठा हल्ला झाला होता. भारतीय संसदेवर लष्कर-ए-तयब्बा आणि जैश-ए-महम्मदच्या अतिरेक्यांनी अचानक हल्ला चढवला होता. या हल्ल्यांमध्ये जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी 6 डिसेंबर 2002 ला मोहम्मद अफजल, शौकत हुसैन, अफसान आणि सय्यद अब्दुल रहमान गिलानी यांना दोषी ठरवण्यात आले होते. तर मोहम्मद अफजल याला 9 फेब्रुवारी 2013 ला दिल्लीतील तिहार तुरुंगात फाशी दिली होती.
2002: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना 2001 चा फाळके पुरस्कार
बॉलिवूडमधील योगदानाबद्दल ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना 2001 चा फाळके पुरस्कार जाहीर झाला होता.
इराकचा माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेनला अटक
2003 : आजच्याच दिवशी इराकचा माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेनला त्याच्या घरून अटक झाली. सद्दामला 5 नोव्हेंबर 2006 रोजी इराकी न्यायालयाने 1982च्या दुजैल येथील 148 शिया लोकांच्या हत्याकांडासाठी दोषी ठरवले होते आणि त्यानंतर 30 डिसेंबर 2006 रोजी सद्दामला फाशी देण्यात आली होती.
2016 : सायरस मिस्त्री यांना टीसीएसच्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढलं
सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले. वादविवाद झाल्यानंतर मिस्त्री यांना पदावरुन काढलं होतं. त्यानंतर सायरस मिस्त्री या निर्णयाविरुद्ध कोर्टात गेले होते, मात्र तिथं त्यांच्या विरोधात निकाल लागला होता. काही दिवसांपूर्वीच मुंबई-अहमदाबाद रोडवर सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला.
1899: पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म
प्रसिद्ध सिनेमेटोग्राफर पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. अनेक हिंदी-मराठी सिनेमांसाठी त्यांनी सिनेमेटोग्राफर म्हणून काम केलं आहे. छाया, धर्मवीर, प्रेमवीर, ज्वाला , ब्रह्मचार, ब्रँडीची बाटली, देवता, सुखाचा शोध , लग्न पहावं करुन, अर्धांगी, पहिला पाळणा, भक्त दामाजी , पैसा बोलतो आहे, रामशास्त्री, लाखारानी, चिराग कहाँ रोशनी कहाँ इत्यादी अनेक चित्रपटांची उत्कष्ट सिनेमेटोग्राफी त्यांनी केली.
1955 : मनोहर पर्रीकर यांचा जन्म (manohar parrikar birth anniversary)
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा आज जन्मदिवस. गोव्यातल्या म्हापसामध्ये 13 डिसेंबर 1955 रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण (पर्रिकर भारतातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि पहिले आयआयटीयन जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं. 2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली. गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 17 मार्च 2019 रोजी त्यांचं निधन झालं.
1960 : प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेते व्यंकटेश दग्गुबाती यांचा जन्म Venkatesh Daggubati birthday)
सिद्ध दक्षिणात्य अभिनेते व्यंकटेश दग्गुबाती यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. दग्गुबाती व्यंकटेश हा एक भारतीय चित्रपट अभिनेता. व्यंकटेशनं मुख्यतः तेलुगु सिनेमा आणि हिंदी चित्रपटात काम केलं आहे. सुप्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माता डी रामानायडूचा तो मुलगा आहे. आपल्या तीसहून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत व्यंकटेशने अनेक चित्रपटात काम केले. वेंकटेशला सात राज्य नंदी पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाले आहेत.
1986: स्मिता पाटीलचं निधन (Smita Patil Death Anniversary)
सौंदर्याची परिभाषा बदलणाऱ्या या स्मिता पाटीलचा आज स्मृतिदिन. स्मिता पाटील हिचा जन्म पुण्यात झाला. तिचे वडील शिवाजीराव पाटील हे राजकारणी आणि समाजवादी विचारांचे तर आई विद्याताई पाटील या समाजसुधारक. स्मिताने तिच्या फिल्मी करियरमध्ये अनेक समांतर चित्रपट केले. अनेक चित्रपटांमध्ये तिने कणखर स्त्रीची भूमिका साकारली. यामागे तिच्या आईचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातंय. स्मिताच्या आयुष्यात सर्वात आव्हानात्मक काळ होता तो तिचा आणि राज बब्बरचे प्रेम प्रकरणाचा काळ. लग्न झालेल्या राज बब्बरच्या ती प्रेमात पडली होती. या प्रेमाला स्मिताच्या कुटंबाचा विरोध होता. महिलांच्या समस्येवर स्मिता नेहमीच आवाज उठवायची. त्याच स्मिताने एका लग्न झालेल्या महिलेच्या आयुष्याचं नुकसान करू नये असं विद्याताईंना वाटायचं. राज बब्बरने तिच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे स्मिताच्या आणि राज बब्बरच्या लग्नाला त्यांचा विरोध होता. पण स्मिता प्रचंड जिद्दी होती. तिने राज बब्बरलाच आपला जोडीदार निवडला होता. आयुष्यातील अत्यंत खडतर तणावाच्या काळातून, मानसिकतेतून जात असलेल्या स्मिताला मुलगा झाला, पण त्यानंतर तिला नेटल प्रॉब्लेमला सामोरं जावं लागलं. याचं निदान लवकर झालं असतं तर ती यातून बरी झाली असती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. समाजातील रूढी परंपरांना आपल्या रील आणि रिअल लाईफमध्ये आव्हान देणाऱ्या स्मिताला यातून बाहेर पडता आलं नाही आणि यातच तिचं निधन झालं. स्मिता नावाच्या या वादळानं 19 डिसेंबर 1986 रोजी जगाचा निरोप घेतला. चित्रपट सृष्टीमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल स्मिताला 1985 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मंथन, भूमिका, आक्रोश, चक्र, निशांत, वारीस, अर्थ, मिर्च मसाला, आज, नजराणा या चित्रपटातील भूमिकांनी तिने रसिकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. तसेच सामना, जैत रे जैत, राजा शिव छत्रपती, उंबरठा या सारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची उंची दाखवली.
1994 : विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचं निधन
सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी असलेल्या विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांचं निधन आजच्या दिवशी झालं होतं.