एक्स्प्लोर

विंडीजचं टीम इंडियासमोर विजयासाठी 316 धावांचं आव्हान, पूरन, पोलार्डची स्फोटक खेळी

अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.

कटक : निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डच्या स्फोटक खेळीमुळे वेस्ट इंडिजनं टीम इंडियासमोर 316 धावांचं आव्हान ठेवलं आहे. विंडीजनं मर्यादित 50 षटकांत पाच बाद 315 धावांचा डोंगर उभारला. निकोलस पूरननं 64 चेंडूत 89 धावा कुटल्या. तर पोलार्डनं तीन चौकार आणि सात षटकारांसह 73 धावा फटकावल्या. भारताला आता हा सामना जिंकत मालिका जिंकण्यासाठी 316 धावांची गरज आहे. अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली.  सुरुवातीलाल शाई होप आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. मात्र यासाठी त्यांनी बरेच चेंडू खर्च केले. रविंद्र जाडेजाने विंडीजची जोडी फोडली. यानंतर रोस्टन चेस, हेटमायर आणि होप यांनी फटकेबाजी करत विंडीजचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र सैनीने हेटमायर आणि चेसला तर शमीने होपला माघारी धाडत विंडीजला धक्का दिला. भारताकडून नवदीप सैनीने 2 तर रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचं पदार्पण भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनं आज विंडीजविरुद्धच्या सामन्यात वन डे पदार्पण केलं. भारताकडून वन डे खेळणारा सैनी हा 229 वा खेळाडू ठरला. सामना सुरु होण्याआधी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या हस्ते सैनीला वन डे कॅप प्रदान करण्यात आली. सैनीनं याआधी ऑगस्ट 2017 साली आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी ट्वेन्टीत पदार्पण केलं होतं. त्यानं आजवर 48 लीस्ट ए सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत शाय होपच्या तीन हजार धावा पूर्ण  विंडीजचा सलामीवीर शाय होपनं कटकमध्ये वन डे कारकीर्दीत तीन हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. होपनं अवघ्या 67 डावात ही कामगिरी करुन हाशिम अमलानंतर सर्वाद जलद तीन हजार धावा पूर्ण करण्याचा मान मिळवला. आमलानं 57 डावांत तीन हजार धावांचा टप्पा गाठला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 July 2026: आजचा मंगळवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अद्भूत शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अद्भूत शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
युक्रेनमध्ये मालवाहू जहाजावर रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ला, चार भारतीयांसह एकूण 10 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर  
Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना
अपुऱ्या कागदपत्रामुळं दस्त नोंदणी करण्यास नकार, रागातून थेट अधिकाऱ्यावरच हल्ला, पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget