(Source: ECI | ABP NEWS)
मी मिसाईल तंत्रात निष्णात, मलाही पाकविरोधात लढू द्या; कारगिल युद्ध लढलेल्या निवृत्त सार्जेंटची आर्त; हवाईदल प्रमुखांना मागणीचे पत्र
India Pakistan War : पाकिस्तान विरोधात होणाऱ्या संभाव्य लढ्यात मलाही लढू द्या, मी पुन्हा हवाई दलामध्ये रुजू होऊ इच्छितो. अशी मागणी हवाई दलातील एका निवृत्त सार्जेंटने हवाईदल प्रमुखांना केली आहे.

India Pakistan War : पाकिस्तान विरोधात होणाऱ्या संभाव्य लढ्यात मलाही लढू द्या, मी पुन्हा हवाई दलामध्ये रुजू होऊ इच्छितो. अशी मागणी हवाई दलातील एका निवृत्त सार्जेंटने हवाईदल प्रमुखांना केली आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर येणाऱ्या काळात पाकिस्तान (Pakistan) सोबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे काही माजी सैन्य अधिकारी पुन्हा लष्करी सेवेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यापैकीच एक आहे नागपुरातील संदेश सिंगलकर (Retired Sergeant Sandesh Singalkar). संदेश सिंगलकर यांनी हवाई दलात 16 वर्ष त्यांची सेवा दिली आहे. ते हवाई दलाच्या मिसाईल तंत्रज्ञानावर काम करत होते आणि कारगिल युद्धामध्ये ही सहभागी झाले होते. 2004 मध्ये कौटुंबिक कारणांसाठी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर आता पुन्हा पाकिस्तान सोबत लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे आणि त्या संदर्भात हवाई दलाच्या प्रमुखांना पत्रही पाठवले आहे. (Operation Sindoor)
निवृत्त सार्जेंट संदेश सिंगलकर यावेळी म्हणाले की, रशियन बनावटीच्या इग्ला मिसाईल तंत्रात मी निष्णात असून माझी गरज भासल्यास मला पुन्हा सेवेची संधी द्या, मी हाय अल्टीट्युड रणक्षेत्रात लढण्यास तरबेज असून पाकिस्तान सोबत लढण्यास तयार आहे. अशा आशयाचा पत्र त्यांनी हवाईदल प्रमुखांना पाठवला आहे. नियमानुसार अशा पद्धतीने पुन्हा सैन्यात रुजू होता येत नाही. मात्र, संदेश सिंगलकर यांच्या या भूमिकेतून भारतीय नागरिकांच्या मनातली भावना ध्वनीत होतोय.
पाकिस्तानकडून सीमारेषेवर पुन्हा गोळीबार, शस्त्रसंधीचे उल्लंघन
भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. या ऑपरेशनतंर्गत पीओकेमधील (POK) 9 ठिकाणी क्षेपणास्त्रांचा मारा करुन दहशतवादी तळ बेचिराख करण्यात आले. अवघ्या 25 मिनिटांत भारतीय वायूदलाने ही सगळी कामगिरी पार पाडत पाकिस्तानी सैन्याला चपराक लगावली. पण दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये काल पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात 15 निष्पाप भारतीयांचा जीव गेला आहे. सुमारे 43 हून अधिक नागरिक जखमी आहेत. जखमींमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे. तर या गोळीबारात हरियाणातील जवान दिनेश कुमार शहीद झालेत. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनींसह अनेक नेतेमंडळींनी याबाबत शोक व्यक्त केलाय. तुमचं योगदान देश कधीही विसरणार नाही, असं ट्विट सैनी यांनी केलंय.
हे ही वाचा
























