Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. महायुतीकडून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) निवडणुकीच्या रिंगणात आहे. नाशिक लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 


काल (दि. 15) महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) सभा पिंपळगाव बसवंत येथे पार पडली तर. तर राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नाशिकमध्ये सभा झाली. तसेच दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा झाली. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचार सभा सुरु असतानाच अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी रॅली काढत त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. 


शांतीगिरी महाराजांचा प्रचारासाठी नवा फंडा


या पाठोपाठ आज शांतीगिरी महाराजांनी प्रचाराचा नवा फंडा शोधला आहे. सायकलवरून प्रवास करत शांतीगिरी महाराजांनी आज नाशिकमध्ये प्रचार केला. शांतीगिरी महाराजांच्या अपक्ष उमेदवारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रंगत आली आहे. एखाद्या मुरब्बी राजकीय नेत्या प्रमाणेच शांतीगिरी महाराज प्रचारात नवनवीन फंडे आजमावत आहेत. 


प्रदूषणमुक्तीचा संदेश देत सायकलवर प्रचार 


कधी रथात बसून, कधी बैलगाडी मधून प्रचार करणारे शांतीगिरी महाराज पर्यावरण रक्षण आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश देत सायकलवर बसून प्रचार करत आहेत. राजकीय पक्ष मोठं मोठ्या सभा, रोड शो करत असताना शांतीगिरी महाराजांच्या वेगवेगळ्या फंड्याची मतदारसंघात चांगलीच चर्चा होत आहे. आता नाशिक लोकसभेत हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे की शांतीगिरी महाराज बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


आता निवडणुकीतून माघार नाही - शांतीगिरी महाराज 


दरम्यान, शांतीगिरी महाराज यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना म्हटले की, नाशिक लोकसभा मतदारसंघात शांतीगिरी महाराज यांनी माघार घ्यावी यासाठी भाजपचे मोठे प्रयत्न सुरु होते. माघार घेण्यासाठी भाजपचे मंत्री गिरीश महाजन मला भेटले होते, असे शांतीगिरी महाराजांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घालवून देणार होते. मात्र मी प्रचारात व्यस्थ असल्याने वेळेअभावी मी नरेंद्र यांना भेटू शकलो नाही. मात्र आता निवडणुकीतून माघार नाही, अशी स्पष्ट भूमिका शांतीगिरी महाराजांनी घेतली.


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये महायुती अन् मविआचा प्रचाराचा धुराळा, शांतीगिरी महाराजही पवित्र्यावर ठाम, राजकीय वातावरण तापलं!