Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्या प्रमुख लढत होणार आहे. 


आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे महायुतीच्या (Mahayuti) उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये आजचा दिवस मोठ्या राजकीय घडामोडींचा दिवस आहे.


शांतीगिरी महाराज पवित्र्यावर ठाम


पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे, शरद पवार या दिग्गज नेत्यांच्या त्यांच्या उमेदवारांसाठी सभा होत असताना दुसरीकडे शांतीगिरी महाराज देखील मागे नाही. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन करत आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत रॅली काढली. 


शांतीगिरी महाराजांचे नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन


त्र्यंबकेश्वर परिसरात शांतीगिरी महाराजांच्या परचारार्थ रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुध्द राजकारणाचा, असा नारा देत शांतीगिरी महाराज नाशिक लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. हेमंत गोडसे, शांतीगिरी महाराज की राजाभाऊ वाजे? नाशिकमधून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


शांतीगिरी महाराजांकडून जाहीरनामा प्रसिद्ध


दरम्यान, काही दिवसांपूर्वी शांतीगिरी महाराजांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहिरनाम्यात शांतीगिरी महाराजांकडून अनेक मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. 


शेतकरी प्रथम प्राधान्य : मतदारसंघात शेतकरी विकास केंद्र उभारणार, मालाला हमीभाव, 24 तास वीज आणि पाणी सुविधा देणार. 


नागरी सुविधा : अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पुढील 25 वर्षांचा विचार करून आराखडा, वाहतूक कोंडी सोडवणार 


उद्योग : नाशिकच्या तरुणांना शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी बाहेर जावे लागणार नाही, आयटी पार्कचा पाठपुरावा करू, स्टार्ट अपसाठी प्रयत्न करणार 


कनेक्टिव्हिटी : शिक्षण, योग आणि संस्कृत विद्यापीठ उभारणार, तीर्थक्षेत्र विकास करणार, अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, आदर्श कुंभमेळा व्हावा यासाठी प्रयत्न.


आणखी वाचा 


PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधील सभेआधी शेतकरी आक्रमक, कांद्याच्या माळा गळ्यात घालून जोरदार आंदोलन