Era Of Anime : तासनतास टीव्ही किंवा माेबाईलवर कार्टून्स पाहण्यात मुले वेळ घालवतात. त्यामधील गमती जमती त्यांना भुरळ घालतात. मात्र, माेठे झाल्यानंतर हेच कार्टून्स तरुणाई शक्यताे पाहत नाही. कधीतरी बालपणीच्या आठवणी जाग्या करण्यासाठी कार्टून्स (Cartoons) पाहिले जातात. पण, आता जपानी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ‘अ‍ॅनिमी’ या कार्टून प्रकाराची तरुणाईला भुरळ पडली आहे. महाविदयालयीन तरूण व तरूणी हे ‘ॲनिमी’ कार्टूनचे एपिसाेड पाहत आहेत.


अ‍ॅनिमी हा मुळात जपानी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये तरूणाईशी संबंधित असणा-या रिलेसेनशिप, फ्रेंडशिप, सुपरनॅचूरल पाॅवर याबाबतचा कंटेंट असताे. साेबत, त्यातील पात्रांमधील कार्टूनचे स्वरूप हे व्यंगात्मक नसून माणसांरखे असते. यातले प्रत्येक पात्र हे मानवी चेहेऱ्यांशी संबंधित आहे. यातले प्रत्येक पात्र हे मानवी चेहेऱ्यांशी संबंधित आहे. इतकेच नव्हे तर हावभावही बारकाईने दिसतात. हे सर्व तरूणाईच्या दैनंदिन अनुभवांशी जुळते. साेबत यामध्ये ॲक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा अशा थोडक्यात नऊ रसांनी युक्त असे हे अ‍ॅनिमी आहे आणि म्हणूनच विरंगुळा म्हणून हे जास्त प्रमाणावर पाहिले जाते.


फुलमेटल अल्केमिस्ट , नारुटो , डेथ नोट , वन पीस , ड्रॅगन बॉल , डेमन स्लेअर , हे अतिशय नावाजलेले अ‍ॅनिमी आहेत. या अ‍ॅनिमीनी मिलिअन, बिलिअन चे मार्केट सध्या तयार केले आहे. हे मोजके अ‍ॅनिमी आवडीने पाहणार्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये हा प्रकार लाेकप्रिय हाेत आहे.


मात्र, तरुण मुलांच्या मते कार्टून्स आणि अ‍ॅनिमी या दोन  वेगळ्या गोष्टी आहेत. अ‍ॅनिमी हे वास्तविक-जगातील वस्तू आणि पात्रांचे वास्तववादी तसेच अर्ध वास्तववादी चित्रण आहेत. त्यामुळेच ते तरुणाईला जास्त जवळचे वाटते. मुळात या अ‍ॅनिमीमध्ये सुपरहिरो आणि सुपरनॅचरल पॉवर बद्दल दाखवले आहे. एक हिरो असतो आणि त्याच्याकडे अनेक प्रकारच्या शक्ती असतात. यात एक्शन , रोमान्स , कॉमेडी , ड्रामा , थोडक्यात नऊ रसांनी युक्त असे हे अ‍ॅनिमी आहे. म्हणूनच विरंगुळा म्हणून हे जास्त प्रमाणावर पाहिले जाते.


फुलमेटल अल्केमिस्ट , नारुटो , डेथ नोट , वन पीस , ड्रॅगन बॉल , डेमन स्लेअर , हे अतिशय नावाजलेले अ‍ॅनिमी आहेत. या अ‍ॅनिमीनी मिलिअन , बिलिअन चे मार्केट सध्या तयार केले आहे.आणि हे मोजके अ‍ॅनिमी आवडीने पाहणार्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच जे जास्त पाहिले जातात आणि जास्त मनोरंजक आहेत त्यावर मूव्ही देखील निघाले आहेत. मांगा नावाने विविध अ‍ॅनिमीचे कॉमिक बुक पहिल्यांदा पब्लिश केले जाते जेणेकरून स्टोरी चोरल्या जाऊ नयेत आणि मग एपिसोड बनवले जातात.  एका अ‍ॅनिमी चे जवळपास एकावेळी ७०० ते १००० एपिसोड निघतात. Crunchyroll आणि नेटफ्लिक्स वर तरुणाईसाठी सर्व प्रकारचे अ‍ॅनिमी उपलब्ध करून दिलेले असतात. डाउनलोड करून कितीही वेळ मुले हे पाहू शकतात.


अ‍ॅनिमी खूप काही शिकवते. मुळात मैत्री कशी निभावली जाते हे यातून शिकायला मिळते. एक एपिसोड पाहिले की पुढे अजून पाहवेसेच वाटते इतके ते मनोरंजनात्मक असते. सुपरहिरो अणि त्यांचाकडे असणाऱ्या सुपरनॅचरल पॉवर यामुळे अ‍ॅनिमी पाहायला जास्त इंटरेस्ट येतो -  केदार स्वामी(तरुण)
 


सुरुवातीस मला अ‍ॅनिमी हे कार्टून वाटायचे पण मित्र ओरडायचे की कार्टून वेगळे आणि अ‍ॅनिमी वेगळे. आणि जेव्हा पाहायला घेतले तेंव्हा अजून पाहवेसे वाटले. पाहिले नारुटो पाहायला घेतली आणि आवड निर्माण झाली - प्राजक्ता पाटील (तरूणी)


 


इतर महत्वाच्या बातम्या


World Emoji Day 2023 : इमोजीचा शोध कुणी लावला? 'वर्ल्ड इमोजी डे' साजरा करण्यामागचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर...