एक्स्प्लोर

जर बायडेन निवडणूक जिंकले तर 'कम्युनिस्ट' कमला हॅरिस त्यांची खुर्ची बळकावतील: डोनाल्ड ट्रंम्प

ट्रंम्प यांनी कमला हॅरिस यांना 'राक्षस' असे संबोधले आणि त्या निवडून आल्यास देशात गुन्हेगारांना प्रवेश मिळेल असाही आरोप केला.ट्रंम्प यांच्या मते जो बायडेन हे दोन महिनेही अध्यक्ष राहणार नाहीत.

वॉशिंग्टन: येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकीत अध्य़क्ष पदाचे उमेदवार जो बायडेन जर जिंकले तर एक-दोन महिन्याभरातच त्यांची जागा कमला हॅरिस घेतील असा खळबळजनक आरोप अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी त्यांच्या विरोधकांवर केला. बुधवारी झालेल्या उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या डिबेटमध्ये उपाध्यक्ष माईक पेन्स आणि कमला हॅरिस हे दोघे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांत ट्रंम्प यांनी कोरोनाच्या काळातील हाताळलेली परिस्थिती , चीनसोबतचा तणाव, वंशभेदाचा मुद्दा आणि वातावरण बदल या मुद्द्यांवरुन जोरदार खडाजंगी झाली. या वादविवादात माईक पेन्स यांनी कमला हॅरिस यांना डाव्या विचारांची व्यक्ती असे संबोधले होते. कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पार्टीच्या उपाध्यक्षीय पदाच्या उमेदवार आहेत फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रंम्प म्हणाले की, "कमला हॅरिस या 'भयंकर' आहेत. त्या कम्युनिस्ट आहेत. सोशलिस्ट विचारांच्याही पलिकडचे त्यांचे विचार आहेत. प्रत्येकाचे मत हे त्यां डाव्या विचारांच्या आहेत असेच आहे. जो बायडेन जर सत्तेत आले तर केवळ दोनच महिन्यांत त्यांची जागा कमला हॅरिस घेतील असे माझे मत आहे. आपल्याला कम्युनिस्ट राष्ट्राध्यक्ष हवा आहे का?" उपाध्यक्ष पदाच्या वादविवादानंतर ट्रंम्पनी पहिल्यांदाच दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले. फोनवरून घेण्यात आलेली ही मुलाखत जवळपास एक तास चालली होती. ट्रंम्प यांनी कमला हॅरिस यांच्यावरील आपला हल्ला अधिक तीव्र करताना सांगितले की कमला यांच्या विचारांवर लक्ष द्या. त्यांना आपल्या देशाच्या सीमा खुल्या करायच्या आहेत आणि हत्यारी, खुनी, बलात्कारी लोकांना आपल्या देशात प्रवेश द्यायचा आहे. ट्रंम्प यांनी कमला हॅरिस यांना 'राक्षस' आणि 'चिडखोर' असेही म्हंटले. उपराष्ट्रपती पदाच्या डिबेट नंतर एका रॅलीला संबोधित करताना माईक पेन्स म्हणाले की, "ही डिबेट दोन व्यक्तीतील नसून दोन विचारांतील होती. जो बायडेन आणि कमला हॅरिस हे कर वाढ, देशाच्या खुल्या सीमांचे समर्थन करतात तसेच त्यांना सर्वोच्च न्यायालयाला बंद झालेलं हवं आहे." अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. ते आता हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन व्हाईट हाऊसवर आले आहेत. येत्या 15 ऑक्टोबर रोजी त्यांची बायडेन यांच्यासोबत दुसरी अध्यक्षीय डिबेट होणार आहे. कोरोना काळात सुरक्षेच्या कारणाने ही डिबेट व्हर्च्युअल घेणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलय. यामुळे ट्रंम्प यांनी अशा डिबेटमध्ये मी सहभागी होणार नाही असे सांगत या डिबेटवर बहिष्कार टाकायचं घोषित केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध होता, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
Nagpur News : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्री अन् महसूल मंत्री बावनकुळेंचा मुक्काम! बळीराजाच्या घरी स्वयंपाकाला उशीर झाला अन्...., लोहारी सावंग्यात नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्री अन् महसूल मंत्री बावनकुळेंचा मुक्काम! बळीराजाच्या घरी स्वयंपाकाला उशीर झाला अन्...., नागपूरच्या लोहारी सावंग्यात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Sonia Gandhi Journey of Love: माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
माझ्या राजकारणातील प्रवेशास राहुल-प्रियांकाचा विरोध, सोनिया गांधींना सांगितलं पंतप्रधानपद नाकारण्यामागचं कारण
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
Embed widget