मुंबई: भारतात कुस्ती ही प्रामुख्याने ग्रामीण भागात खेळली जाते. या कुस्तीला आताआंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात मान्यता मिळताना दिसत आहे. जगभरात कुस्तीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे फ्रीस्टाइल कुस्ती. साक्षी मालिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया हे असे काही पैलवान आहेत जे फ्रीस्टाइल कुस्ती खेळतात. आता आॅलिम्पिकमध्ये ग्रीक आणि रोमन कुस्ती सोबतच फ्रीस्टाइल कुस्तीनेही आपली वेगळी जागा बनवली आहे. अनेक मुला-मुलींचे स्वप्न असते की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे, आपण पैलवान बनावे.
चांगल्या आखा़ड्याची निवड करणे महत्वाचे
कुस्तीसाठी आखाडा फार महत्वाचा आहे. त्यासाठी उत्तम कुस्ती मैदानाची निवड करणे फार महत्वाचे असते. कोणताही आखाडा निवडण्याआधी त्या आखाड्यावरून किती पैलवान स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल पर्यंत पोहोचले आहेत याची माहीती घ्यावी. तसेच निवडलेल्या आखाड्याबद्दल तिथे शिकत असणाऱ्या इतर मुलांना विचारावे.
सुविधांची पातळी
आखाड्यामध्ये पारंपारिक साधनांसोबतच नवीन साधने देखील असायला हवीत. कुस्ती खेळण्यासाठी लागणारी मॅट, एसी असलेले हाॅल, लेटेस्ट ईक्वीपमेंट अशा सगळ्या सोयींनी युक्त आखााडा असावा.
कोच कसा निवडावा?
तुम्हाला शिकवणाऱ्या कोचबद्दल तुम्ही माहिती घ्यायला हवी. कोचकडे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स (NIS) पटियाला येथील डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. बऱ्याच ठिकाणी स्वता: प्रशिक्षण देत असतात. पण एक चांगला पैलवान उत्तम कोच असतोच असे नाही. त्यामुळे कोचबद्दल माहिती घेऊनच आपला कोच निवडावा.
पुरूष पैलवनांची वजन कॅटेगरी काय असते
शाळा: अंडर-14 मध्ये 30 ते 60 किलो, अंडर-17 मध्ये 42 ते 100 किलो, अंडर-19 मध्ये 42 ते 120 किलो
सब-ज्युनियर किंवा 17 वर्षाखालील 42 ते 100 किग्रॅ
ज्युनियर किंवा 20 वर्षाखालील 50 ते 120 किलो
ज्येष्ठ (18 वर्षांवरील) वजन 57, 61, 65, 70, 74, 84, 96 आणि 125 किलो पर्यंत आहे.
महिला पैलवनांची वजन कॅटेगरी काय असते
शाळा : 14 वर्षाखालील 30 ते 60 किलो
सब-ज्युनियर किंवा अंडर-17: 38 ते 70 कि.ग्रा.
ज्युनियर (18 ते 20 वर्षे): 44 ते 72 किग्रॅ
ज्येष्ठ (18 वर्षांपेक्षा जास्त): 48, 53, 55, 58, 60, 63, 69 आणि 75 किलो
स्टेट लेवल पैलवान बनण्यासाठी काय करावे
स्टेट लेवल पैलवान बनायचे असेल तर वयाच्या 6 ते 10 वयोगटामध्ये असतानाच प्रशिक्षण सुरू करावे. कोच असा निवडावा ज्याने अनेक चांगल्या पैलवानांना ट्रेन केले आहे. अशा कोचच्या देखरेखी खाली ट्रेनिंग सुरू करावे. जोरदार मेहनत आणि रोजची प्रॅक्टीस यामुळे यश लवकर मिळू शकते. आत्मविश्वास वाढण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्यायला हवा. त्यासाठी कुस्ती क्लबमध्ये सहभागी व्हावे.
राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घ्यावा
भारतात अनेक प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धा होतात. महाराष्ट्र राज्य कुस्ती चँपियनशिप, उत्तर प्रदेश राज्य कुस्ती चँपियनशिप, तमिलनाडू राज्य कुस्ती चँपियनशिप, आंध्र प्रदेश राज्य कुस्ती चँपियनशिप, कर्नाटक राज्य कुस्ती चँपियनशिप इ. अशा स्पर्धेत सहभाग घ्यावा.
नॅशनल लेवल स्पर्धा
राज्यस्तरीय स्पर्धेसोबतच नॅशनल लेवल स्पर्धा देखील घेतल्या जातात. वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती चँपियनशिप, जूनियर राष्ट्रीय कुस्ती चँपियनशिप, युवा राष्ट्रीय कुस्ती चँपियनशिप, सब-जूनियर राष्ट्रीय कुस्ती चँपियनशिप यात देखील दरवर्षी सहभाग घ्यावा.
महत्वाच्या इतर बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI