Horoscope Today 19 February 2024 : आजचा दिवस, सोमवार 19 फेब्रुवारी 2024, काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी खास असणार आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या
मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी डोळे आणि कान उघडे ठेवून काम करा, अन्यथा तुमचे काही विरोधी सहकारी तुमच्यावर अरेरावी करतील. आज समोरचा व्यक्ती तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा त्यांच्या प्रगतीत काही अडथळे येऊ शकतात. ऑफिसमध्ये मोठं नुकसान टाळावं लागेल. तुम्हाला तुमचा आळस सोडून पुढे जावं लागेल. आज व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल. आज तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होऊ शकतो. आज कुटुंबातील किंवा सासरच्यांशी वाद टाळावे, अन्यथा नातेसंबंध बिघडतील.
वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही आणि काही काम करण्यासाठी चांगला असेल. जर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याची तब्येत बिघडली असेल तर तुम्हाला त्याची काळजी वाटेल. तुम्हाला कोणत्याही शॉर्टकट पद्धतीने पैसे मिळवणं टाळावं लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकतं. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल. कुटुंबातील लहान मुलांसाठी तुम्ही काही खाऊ घेऊन येऊ शकता. व्यावसायिकांसाठी वेळ सामान्य आहे, नवीन योजना सोडून जुन्या योजनेवर काम करा. आज तुम्हाला तब्येतीची चिंता राहील. नोकरीत दडपण वाढेल, सावधपणे आणि हुशारीने काम करा.
मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असेल, त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. तुमचं एखादं सरकारी काम दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात तुम्ही कोणालाही पैसे उधार देऊ नका, अन्यथा ते पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. आज तुम्हाला एखाद्या मित्राच्या घरी जावं लागू शकतं. आज तुम्हाला नोकरीच्या मोठ्या ऑफर्स मिळू शकतात. विद्यार्थी अभ्यासात नाव कमावतील.
कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्या महत्त्वाचा असेल. आज वडिलांची तब्येत बिघडली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. वाईट विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांना आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवणं टाळावं लागेल. आज काही लोकांना पैशाची समस्या असेल, तर काहींना आर्थिक लाभ होईल. तुमचं जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाकडे तरी आकर्षण राहील. तुमच्या चुकीच्या पावलांचा परिणाम नातेसंबंधांवर होईल, त्यामुळे सावध राहा.
सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मोठे बदल होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जमीन आणि वाहन खरेदीचा निर्णय होऊ शकतो. आज तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल, परंतु तुमच्या मूडमध्ये चढ-उतार जाणवेल, ज्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. धीर धरा. आज वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. वाहनाच्या देखभालीवर पैसे खर्च होऊ शकतात.
कन्या (Virgo Horoscope Kanya Today)
कामामुळे जास्त ताण घेऊ नका. नातेसंबंध सुधारतील, परंतु रागावर नियंत्रण ठेवा, स्वतःवर नियंत्रण ठेवा. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि संपत्ती वाढेल. अभ्यासात तुमची प्रगती दिसेल. आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे मन अस्वस्थ राहू शकतं. व्यावसायिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतील. स्वभावात चिडचिडेपणा राहील. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.
तूळ (Libra Horoscope Tula Rashi Today)
व्यावसायिक जीवनात नवीन यश मिळवाल. बोलण्यात गोडवा राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. मुलांच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल, परंतु कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. नोकरी-व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहील. उत्पन्नाच्या नवीन स्रोतातून आर्थिक लाभ होईल. जुन्या मित्रांशी भेट होईल, आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल, मानसिक शांति लाभेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी किरकोळ आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.
वृश्चिक (Scorpio Horoscope Vruschik Rashi Today)
धार्मिक कार्यात रुची वाढेल. परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आज काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. वाहनाच्या देखभालीवर पैसे खर्च होऊ शकतात. मुलांच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहील. आज वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कामातील आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाल.
धनु (Sagittarius Horoscope Dhanu Rashi Today)
प्रलंबित कामं यशस्वी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. शैक्षणिक कार्यात अडथळे येऊ शकतात. नोकरी-व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहील. ऑफिसमध्ये बढतीची शक्यता वाढेल, मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. उत्पन्न वाढीचे नवीन मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील. आईच्या मदतीने आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील.
मकर (Capricorn Horoscope Makar Rashi Today)
शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. कला-संगीताची आवड वाढेल, पण अज्ञानाच्या भीतीने मन अस्वस्थ राहील. मुलांकडून त्रास होऊ शकतो. भावनिकता टाळा आणि घरगुती समस्या हुशारीने सोडवा. आज तुम्हाला तुमच्या भावाला किंवा बहिणीला आर्थिक मदत करावी लागेल. दीर्घ आजारापासून आराम मिळेल, कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल. मालमत्तेची देखभाल करण्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात. घरामध्ये धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याने मन प्रसन्न राहील.
कुंभ (Aquarius Horoscope Kumbha Rashi Today)
आज तुमचं रोमँटिक लाईफ चांगलं राहील. नात्यातील अडचणी दूर होतील. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्याशी बोला. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज मुलाखतीसाठी कॉल येऊ शकतो. आज कोणत्याही आजारापासून सावध राहा. तुम्हाला कान, घसा किंवा नाकाशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. निरोगी राहण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या आणि नियमित व्यायाम करा. पैशांशी संबंधित किरकोळ समस्या असतील, परंतु यामुळे तुमच्या जीवनावर परिणाम होणार नाही.
मीन (Pisces Horoscope Meen Rashi Today)
भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळतील. बोलण्यात सौम्यता राहील. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मोकळे होतील, परंतु अनियोजित खर्च देखील वाढतील. कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. तसेच नोकरी-व्यवसायासाठी वातावरण अनुकूल राहणार आहे. आईच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :