Budh Uday 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्चमध्ये धन, व्यापार, वाणी, बुद्धी आणि तर्क यांचा दाता असलेल्या बुध ग्रहाचा उदय होणार आहे. बुध (Mercury) ग्रहाचा उदय लोकांच्या करिअर आणि आर्थिक स्थितीत मोठा बदल घडवून आणणार आहे.
कधी होणार बुध ग्रहाचा उदय?
ग्रहांचा राजकुमार फेब्रुवारीच्या सुरुवातीला, म्हणजे 8 फेब्रुवारीला मकर राशीत अस्त झाला आणि अजूनही तो अस्त अवस्थेत आहे. बुध 7 मार्चला सकाळी 9.21 वाजता मीन राशीत प्रवेश करेल. 15 मार्चला बुधाचा मीन राशीत उदय होईल.
बुध ग्रहाच्या उदयामुळे 'या' राशींचं नशीब पालटणार
बुधाचा उदय अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू शकतो. या काळात काही राशींच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्या संपुष्टात येतील, समाजात मान-सन्मान वाढेल. बुध ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या अकराव्या भावात बुध ग्रहाचा उदय होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला आर्थिक लाभही होईल. बुधाच्या उदयामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. यासोबतच तुम्ही नवीन लोकांशी मैत्री करू शकता. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे. आयात-निर्यात व्यापारात वाढ होऊ शकते. शेअर बाजारात प्रवेश करणे फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती चांगली होऊ शकते.
मिथुन रास (Gemini)
बुध ग्रहाचा या राशीच्या दहाव्या भावात उदय होईल. मिथुन राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय शुभ ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची कामातील मेहनत पाहता तुमच्या प्रमोशनची शक्यता खूप जास्त दिसते. यासोबतच कौटुंबिक वातावरण चांगलं राहणार आहे. नवीन वाहन, घर, मालमत्ता घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या नवव्या घरात बुध ग्रहाचा उदय होईल. बुधाचा उदय कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीचे लोक अध्यात्माकडे अधिक आकर्षित होतील. तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्हाला तुमचे वडील आणि गुरुंचं पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण झाल्याने मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये फायदे मिळू शकतात. यासोबतच परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. व्यवसायिकांना अफाट यशासोबत आर्थिक लाभही मिळू शकतो.
हेही वाचा :