Holi 2024 : होळीचा सण दरवर्षी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. होळी हा बंधुभाव, परस्पर प्रेम आणि सद्भावनेचा सण आहे. पंचांगानुसार, होलिका दहन हा फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. यावर्षी होलिका दहन (Holi 2024) आज रविवारी, म्हणजेच 24 मार्च 2024 रोजी होणार आहे. तसेच 25 मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल. यंदा होळीच्या दिवशी चार शुभ योग तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढलं आहे. शास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी काही कार्यं करणं वर्ज्य आहे. होळीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये? जाणून घेऊया
होळीच्या दिवशी घडत आहेत हे शुभ योग
होलिका दहनाच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होत आहेत. ज्यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, गंड योग, बुधादित्य योग यांचा समावेश आहे. हे सर्व योग 24 मार्च रोजी घडत आहेत, तर 25 मार्च रोजी धुळवडीच्या दिवशीही अनेक शुभ योग घडत आहेत, या दिवशी वृद्धी योग, बुधादित्य योग, वाशी योग आणि सुनाफ योग तयार होत आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये हे सर्व योग अत्यंत शुभ आणि फलदायी समजले जातात.
होळीच्या दिवशी 'ही' कामं जरुर करा
1. जर तुम्हाला नेहमी कोणत्या तरी अज्ञात गोष्टीची भीती वाटत असेल तर जेव्हा तुम्ही होलिका दहन पाहायला जाल तेव्हा तुमच्या खिशात काजळाची डबी ठेवा, असे केल्याने अज्ञाताची भीती नाहीशी होते.
2. एखाद्या व्यक्तीला किंवा बाळाला सारखी नजर लागत असेल, तर नारळ डोक्याच्या बाजूने सात वेळा आपटून तो होलिकेच्या अग्नीत टाकावा, असं केल्याने नजरदोष कमी होऊ लागतो.
3. होलिका दहनाच्या दिवशी अग्नीत भाजलेल्या नारळाचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा, असं केल्याने तुम्हाला चांगलं आरोग्य लाभेल.
4. जर तुम्हाला तुमची करिअर आणि व्यवसायात प्रगती होत नसेल तर या दिवशी शिवलिंगाला सात गोमती चक्र अर्पण करा, असं केल्याने तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल.
होळीच्या दिवशी चुकूनही करू नका 'ही' कामं
1. होलिका दहनाच्या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका, असं केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
2. काही लोक आपल्या घरातील कचरा होलिका दहनाच्या आगीत टाकतात, हे चुकीचं आहे. असं केल्याने तुमच्या जीवनात गरिबी येऊ शकते.
3. होलिका दहन किंवा धुळवडीच्या दिवशी लोखंड किंवा स्टीलच्या वस्तू दान करू नये, असं करणं अशुभ मानलं जातं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :