Astrology Today 24 March 2024 : आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीमुळे फार महत्त्वाचा मानला जातो. आज, रविवार, 24 मार्च, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा आहे आणि या दिवशी होलिका दहन हा सण साजरा केला जातो. होलिका दहनाच्या दिवशी चंद्र कन्या राशीत प्रवेश करत आहे. होळीच्या दिवशी वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांसारखे शुभ योगही तयार होणार आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा फायदा होणार आहे. या भाग्यवान 5 राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप लाभदायक असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही काही नवीन आणि खास लोकांशी संपर्कात येऊ शकता, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमच्या राहणीमानात चांगली सुधारणा होईल आणि जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळू शकतात. तुमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुमचं कोणतंही प्रलंबित काम वेळेवर पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून चांगली मदत मिळेल आणि घरामध्ये होळीची तयारी सुरू राहील. होळीच्या मुहूर्तावर व्यावसायिकांना चांगला नफा होईल आणि होळीच्या निमित्ताने केलेल्या व्यावसायिक योजनाही यशस्वी होतील. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब होलिका दहनात सहभागी होईल.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमच्यात खूप आत्मविश्वास असेल, तुम्ही व्यवसायाच्या क्षेत्रातही चांगलं यश मिळवाल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आज तुमच्यासाठी नफ्याचा दिवस आहे, आज तुम्हाला यशाची चव चाखता येईल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही आणि तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं अधिक घट्ट होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्य केल्याने तुमचा सन्मान वाढेल. संध्याकाळी आम्ही मुलांसोबत होलिका दहनाची तयारी कराल आणि होळीच्या पदार्थांचा आस्वादही घ्याल. तसेच आसपासच्या लोकांना आणि प्रियजनांना होळीच्या शुभेच्छा द्याल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. कन्या राशीच्या लोकांच्या आज काही इच्छा पूर्ण होतील. तुमची सहकार्याची भावना वाढेल आणि तुम्ही सर्वांचा आदर कराल. होळीच्या निमित्ताने घरात खास पाहुणे येऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबात उत्सवाचं वातावरण निर्माण होईल. कामाच्या शोधात असलेले लोक मित्राकडून मदत मागू शकतात. आज तुम्हाला दूर राहणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी कळू शकते. नोकरदार होळीनिमित्त उत्साहात असतील आणि बाहेर कुठेतरी होळी साजरी करू शकतील. संध्याकाळी तुम्ही होलिका दहनाचा सण साजरा कराल आणि होळीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. तुमचा आजचा दिवस शुभ जाईल.


धनु रास (Sagittarius)


आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. आज धनु राशीच्या लोकांचं नशीब उजळेल. आज नोकरी-व्यवसाातून चांगला नफा होईल. कुटुंबापासून दूर राहणारा सदस्य होळीच्या निमित्ताने घरी येऊ शकतो. आज तुम्हाला होळीच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळेल आणि तुम्ही होळीच्या वस्तूही खरेदी करू शकता. तुम्ही घरातील सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल आणि तुमचे भावा-बहिणींसोबतचे संबंध चांगले राहतील. तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक कल्पना मिळतील आणि तुम्ही त्यांची अंमलबजावणी देखील कराल.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ ठरणार आहे. मीन राशीचे लोक आज कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि सौहार्द राखण्यास सक्षम असतील. तुम्ही सगळे मिळून आज होलिका दहन सणाचा आनंद घ्याल. आज तुम्हाला व्यवसायातील अनुभवाचा पुरेपूर फायदा होईल. कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडून होळीच्या वस्तू मागू शकतात. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे मिळाल्याने तुमचं मन प्रसन्न राहील आणि तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. होळीच्या निमित्ताने तुम्ही कुटुंबातील सदस्यांसाठी कपडेही खरेदी करू शकता. आज तुमची काही कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचे संबंध चांगले राहतील. रात्री होलिका दहनाची परंपरा पाळून तुम्ही सर्वांना शुभेच्छा देऊ शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 24 March 2024 : होळीचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार शुभ; सर्व अडचणी होणार दूर, जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य