एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत युवकाने जीवन संपवलं, आरक्षणामुळे शिक्षणापासून दूर राहिल्याची खंत

Maratha Reservation : हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी एका युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण न मिळाल्याने आपण शिक्षणापासून दूर राहिल्याचं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. 

हिंगोली: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यातील आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असून आता हिंगोलीतील नहाद गावामध्ये 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. नहाद गावातील  रहिवासी असलेल्या 21 वर्षीय गोविंद कावळे या तरुणाने चिठ्ठी लिहत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी घेत त्याने आपलं जीवन संपवलं.

आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद कावळेने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत म्हटलंय की, मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे. तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे. 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत युवकाने जीवन संपवलं, आरक्षणामुळे शिक्षणापासून दूर राहिल्याची खंत

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले जातंय. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्याकडून तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तरीही या विषयावरून होणाऱ्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. 

परभणीत आणखी एक आत्महत्या

मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळत नसल्यामुळे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. जिंतुर तालुक्यातील बोर्डी येथील 39 वर्षीय बापुराव उत्तमराव मुळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील ही दुसरी आत्महत्येची घटना आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले जातायत. त्यातच मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देत परभणीमध्येही साखळी उपोषण सुरु करण्यात आले. 

नेमकं काय घडलं?

बापुराव मुळे हे अंतरवाली सराटी येथील सभेला उपस्थित होते. तेव्हापासून बापुराव हे आरक्षण मिळावे असे म्हणत होते. त्यांना तीन मुले असून ती शिक्षणात हुशार आहेत.आरक्षण मिळत नसल्याने बापुराव मुळे यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी बोरी पोलिसात नोंद घेण्यात आली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडूरंग गोफणे, तहसीलदार सरोदे, सह पोलीस निरीक्षक. सरला गाडेकर, पोलीस उप निरीक्षक अनिल खिल्लारे यांनी भेट दिली. दरम्यान तात्काळ मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे तसेच आत्महत्या केलेल्या तरुणांच्या कुटुंबालाही भरीव मदत करण्याची मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा: 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDA ला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Embed widget