एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Manoj Jarange Sabha : हिंगोलीतील मनोज जरांगेंच्या सभेपूर्वी मोठी अपडेट; पोलिसांनी घेतला महत्वाचा निर्णय

Manoj Jarange Sabha : कार्यक्रमाचे सभास्थळ हिंगोली ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावरील डिग्रस फाटा येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात देखील त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची 7 डिसेंबर रोजी हिंगोलीच्या (Hingoli) डिग्रस फाटा येथे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जाहीर सभा आयेाजित करण्यात आली आहे. या सभेसाठी हिंगोली जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सभास्थळ हिंगोली ते परभणी या राष्ट्रीय महामार्गावरील डिग्रस फाटा येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

मनोज जरांगे यांच्या सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तर, ही सभा 110 एकरवर होणार असून, यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी हिंगोली ते औढामार्गे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. तर, वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गासाठी पर्यायी मार्ग सुरु असणार आहे.  

वाहतूक मार्गात असा बदल असणार...

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग (7 डिसेंबर रोजी)

  • जिंतूर टी पॉईंट वसमत ते औंढा-हिंगोलीकडे येणारी जड वाहनेनागेशवाडी फाटा ते औंढा-हिंगोलीकडे जाणारी जड वाहने
  • हिंगोलीकडून औंढा ना.–परभणीकडे जाणारी जड वाहने 
  • औंढा ना. ते हिंगोलीकडे जाणारी जड वाहने 
  • बोरजा फाटा ते हिंगोलीकडे जाणारी पूर्ण वाहने 
  • नरसी टी पॉईंट ते औंढा ना. कडे जाणारी पूर्ण वाहने 
  • लोहगाव ते डिग्रस पाटीकडे येणारी सर्व वाहने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. 

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग : 

  • नांदेडकडून जिंतूर टी पॉईंट वसमत-औंढा-हिंगोलीकडे येणारी वाहने जिंतूर टी पॉईंट वसमत कौठा पाटी-कुरुंदा-बोल्डा-उमरा फाटा मार्गे हिंगोली जातील.
  • परभणीकडून औंढा मार्गे हिंगोली येणारी वाहने ही झिरो फाटा-नागेशवाडी-वाई शिरळी-बोल्डा-उमरा फाटा मार्गे हिंगोली जातील.
  • अकोला व वाशिमकडून हिंगोली-औंढा मार्गे परभणी जाणारी वाहने ही राष्ट्रीय महामार्गाने उमरा मार्ग-बोल्डा-सिरळी वाई नागेशवाडी मार्गे परभणी जातील.
  • अकोला-वाशिमकडून नांदेडकडे जाणारी वाहने हायवेने बायपास मार्गे हिंगोली जातील. भोसी ते डिग्रस मार्गे हिंगोलीकडे येणारी वाहने ही लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोली जातील.
  • डिग्रस गावातून डिग्रस फाटा मार्गे हिंगोली येणारी वाहने लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोलीकडे जातील.
  • औंढा ते हिंगोली जाणारी हलकी वाहने व मोटार सायकल बोरजा-लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोलीकडे जातील.
  • औंढा हून कळमनुरी जाणारी हलकी वाहने पिंपळदरी-नांदापूर-उमरा मार्गे कळमनुरी कडे जातील. 

वरील दिवशी वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : भुजबळांची तारीख ठरली, जरांगेंचीही तयारी; हिंगोलीत दोन्ही नेत्यांच्या एकामागून एक सभा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget