Hingoli Crime News : हिंगोली पोलीस (Hingoli Police) दलात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. कारण एका सहायक पोलीस निरीक्षक चक्क ड्युटीवर मद्यधुंद अवस्थेत आढळून आला आहे. रात्रीच्या गस्तीवर निघालेला हा पोलीस अधिकारी एवढी दारू प्यायला होता की, त्याला नीट उभं राहणं अवघड झाले होते. दरम्यान गस्तीवर असताना एका पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी गेलेल्या या पोलीस अधिकाऱ्याची अवस्था पाहून त्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे अखेर याची माहिती वरिष्ठांना देऊन या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिरी असे या अधिकाऱ्याचे नाव असून, तो हिंगोली शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील गिरी हे हिंगोली शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. तर 9 एप्रिलला त्यांची नाईट ड्युटी लागली होती. त्यामुळे ते जिल्हा रात्री गस्तीवर होते. दरम्यान गस्तीवर असताना गिरी हे रात्री 1.55 वाजता रात्रगस्त चेकिंगसाठी औंढा पोलीस ठाण्यात पोहचले. मात्र पोलीस ठाण्यात जाताच त्यांची अवस्था पाहून ठाण्यातील पोलिसांना धक्काच बसला. कारण गिरीला व्यवस्थितपणे चालता येत नव्हते. तो बोबड्या भाषेत बोलत होते. तसेच उग्र वास येत असल्याने त्यांनी प्रचंड मद्यपान केल्याचे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आहे.
वरिष्ठांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश
रात्रगस्त चेकिंगसाठी औंढा पोलीस ठाण्यात आलेल्या सुनील गिरी याने अधिकची दारू प्यायलाचे लक्षात येताच, औंढा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी यांनी सदरची बाब वरिष्ठांना कळवली. तसेच गिरी यांना व्यवस्थितपणे चालता येत नसल्याचे देखील कळवले. त्यामुळे वरिष्ठांनी याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिल्याने सुनील गिरी विरोधात औंढा पोलीस ठाण्यात कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी दिलीप किशनराव नाईक यांच्या फिर्यादिनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक झुंजारे करत आहेत. तर गुन्हा दाखल केल्यावर गिरीला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
पोलीस दलात खळबळ...
रात्रीच्यावेळी सर्वसामान्य सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून रात्रीची गस्त केली जाते. तसेच रात्री-बेरात्री अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला पोलीस धावून येतात. तसेच रात्री दारू पिऊन रस्त्यावर वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई देखील करतात. मात्र हिंगोली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सुनील गिरी हे स्वतःच पोलीस गस्तीवर असताना दारूच्या नशेत आढळून आले आहेत. गिरी यांनी एवढ्या मोठ्याप्रमाणावर मद्यपान केले होते की, त्यांना स्वतः उभं राहणं अवघड होत होते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांकडून नागरिकांनी मदतीची काय अपेक्षा ठेवावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर गिरीवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Unseasonal Rain : मराठवाड्याला गारपिटीचा तडाखा; संभाजीनगर, बीडसह हिंगीलो जिल्ह्याला मोठा फटका