Village Does Not Sell Milk : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडं (Milk Business) बघितलं जातं. मात्र महाराष्ट्रात एक असंही गाव आहे, की जिथं दुधाचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, त्या गावात दुधाची विक्री केली जात नाही. या गावात प्रत्येकाच्या घरी दुध देणारी जनावरे आहेत. मात्र ते दुधाची विक्री करत नाहीत. हे गाव आहे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील येळेगाव गवळी (Yelegaon Gawali). नेमकी या गावात दुधाची विक्री का केली जात नाही? त्यामागचे कारण काय? याबद्दलची माहिती पाहुयात...

  
गावातील नागरिक स्वतः ला श्रीकृष्णाचे वंशज मानतात


शेतीला एक महत्त्वाचा पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडं बघितलं जातं. परंतू, हिंगोली जिह्यातील येळेगाव गवळी या गावात दुधाचे उत्पादन घेतलं जातं पण दुधाची विक्री केली जात नाही. ज्या घरी दूधाचे उत्पादन घेतलं जात नाही, त्या घरात दूध मोफत दिलं जातं. या गावातील नागरिक स्वतः ला श्रीकृष्णाचे वंशज मानतात. गोकुळातील दूध विक्रीला श्रीकृष्णाचा विरोध होता. त्यामुळं गवळणीच्या मडक्यात असलेले दूध मथुरेला जाऊ नये यासाठी श्रीकृष्णाने गवळणीच्या कमरेवरील दुधाचे घडे फोडले होते. दूध मथुरेला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. हीच परंपरा हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव गवळी या गावातील नागरिकांनी कायम ठेवली आहे. तीन हजार लोकसंख्या असलेलं येळेगाव गवळी या गावात प्रत्येक घरी दुग्धजन्य जनावरे आहेत. परंतू या गावात एकही नागरिक दूध विकत नाही. 




श्रीकृष्णाने दिलेला संदेश तंतोतंत पाळणारं गाव


येळेगाव गवळी येथील ग्रामस्थ स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज मानतात. त्यामुळं ही परंपरा ग्रामस्थ आजपर्यंत कायम ठेवून आहेत. आपलं गोकुळ सुदृढ आणि निरोगी राहावं म्हणून श्रीकृष्णाने दिलेला संदेश तंतोतंत पाळणारे हे येळेगाव गवळी गाव आहे. 


गावातील गवळ्यांना नंद राजाचे वंशज असल्याचे संबोधलं जातं


येळेगाव गवळी हे गाव संपूर्ण गवळी समाजाचे आहे. या गावात दोनशे ते सव्वादोनशे घरं ही गवळ्याची आहेत. या गावातील गवळ्यांना नंद राजाचे वंशज असल्याचे संबोधले जाते. त्यावरुनचं गावाचे नाव देखील येळेगाव गवळी पडले असल्याची माहिती गावकरी राजाभाऊ मंदारे यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची ख्याती आहे. गवळी समाज आहे पण या गावात एकाही घरी दूध विकले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: