हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli) कळमनुरी शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.  शेतीच्या मोजणीची नोटीस पाहायची असेल तर एक हजार रुपये लागतील याची माहिती वरिष्ठांना दिली. त्यावर वरिष्ठांनी देखील उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे संतापलेल्या शेतकरी पुत्राने संबंधित लाचखोर कर्मचाऱ्याचा इंग्रजीमध्ये चांगलाच समाचार घेतला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 


हिंगोली जिल्ह्यातील दाती येथील शेतकरी दत्तात्रय कदम आणि त्यांचा मुलगा प्रमोद कदम त्यांच्या स्वतः शेतीच्या मोजणीनिमित्त कळमनुरीच्या भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन नोटीसीच्या संदर्भात चौकशी केली.  चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे देत नोटिस दाखवणे टाळले जात होते. नोटिस पाहायची असेल तर एक हजार रुपयांची मागणी केली. संबंधित शेतकऱ्यांनी एक हजार रुपये दिले असता या नोटिसीचा फक्त फोटो काढण्यास परवानगी दिली. शेतीच्या मोजणीसाठी इतर शेतकऱ्यांना का नोटीस दिली नाही असे विचारले असता कर्मचाऱ्याने उत्तर देणे टाळले. त्यावर शेतकरी पिता पुत्रांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर हा प्रकार सांगितला. अधिकाऱ्यांसमोर असता त्यांनी देखील उडवा उडवीची उत्तरे दिली.



 माहिती पाहिजे असल्यास माहिती अधिकाराचा वापर करत माहिती मिळवा असा सल्ला वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने लाच घेतलेल्या कर्मचाऱ्याचा इंग्रजी मधून चांगलाच समाचार घेतला आहे. तर झालेल्या प्रकारावर प्रशासनाची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला तर हा प्रकार गैरसमजूतीतून झाल्याचे भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक नितीन गुरव यांनी सांगितले आहे. तर लाचखोर अधिकाऱ्यांच्या त्रासाला शेतकरी हतबल झाले आहेत.  शेतकरी दत्तात्रय कदम यांनी लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यवाहीची मागणी केली आहे


भूमी अभीलेख कार्यालयातूनच शेत जमिनीच्या मोजणी, जमिनीचे नकाशे, भूमीसंपादनाची मोजणी, जमिनीच्या खरेदी विक्री वारसा, वाटणी संदर्भातील  काम केले जाते.  ही कामे पूर्ण करण्यासाठी  शासकीय मोजणी फी व्यतिरिक्त पैसे उकळण्याचे काम राजरोसपणे सुरू असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.  शेतीची मोजणी, वारस व खरेदी नोंदीसाठी देखील मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जाते. हेलपाटे मारून नागरिकांचे काम होत नाही. चुका दाखवत आर्थिक व्यवहाराशिवाय प्रकरणांना हात लावत नाही. आर्थिक त्रास सहन करूनही खातेदारांचे कामे होत नसल्याने त्यांना चकरा मारण्यास भाग पाडले जात आहे. गोरगरीब, शेतकरी व कष्टकरी नागरिकांना अरेरावी करणे,  असे प्रकार सर्रास सुरू असतात. 


संबंधित बातम्या :


Sangli Crime : सोलरची फाईल मंजूर करण्यासाठी मागितले ४५ हजार; पलूसमधील उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात